घरमनोरंजनBIGG BOSS 15 : शमिता शेट्टी बिग बॉसमधून बाहेर?

BIGG BOSS 15 : शमिता शेट्टी बिग बॉसमधून बाहेर?

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला बिस बॉस हा टीआरपी रेटिंगमुळे आधीच संकटात सापडला आहे. अशातचं शोमधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. राकेश बापट आणि अफसाना खाननंतर आता शमिता शेट्टी देखील शो अर्धवट सोडून बाहेर पडली आहे. शमिताची तब्येत बिघडल्याने तिला घराबाहेर मेडिकल ग्राउंडमध्ये आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान शमिता शेट्टी शोमधून बाहेर पडल्याची बातमी बिग बॉसच्या अनेक फॅन पेजवर व्हायरल होत आहे. पण त्याचे कारण एलिमिनेशन नसून शमिता शेट्टीची तब्येत आहे. शमिता हिला मेडिकल उपचारांसाठी घराबाहेर आणण्यात आले आहे. दरम्यान शमिता मंगळवारी आणि बुधवारी उपचार घेतल्यानंतर शोमध्ये परत येऊ शकते. अशीही माहिती समोर येत आहे. मात्र वाहिनाकडून अद्याप यावर अधिकृत कोणताही माहिती देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

शमिताच्या आधी वाइल्ड कार्डने घरात एन्ट्री झालेला स्पर्धक राकेश बापट याला किडनी स्टोनच्या दुखण्यामुळे उपचारासाठी शोमधून बाहेर पडावे लागले. यानंतर अफसानालाही स्वत:वर चाकूने वार केल्यामुळे शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. स्पर्धकांच्या या खराब खेळीमुळे बिग बॉस शो अधिकचं अडचणीत सापडला आहे. तर शोचा टीआरपी अधिकच घसरतोय. अशा परिस्थितीत शोमधील एक मजूबत स्पर्धक शमिता शेट्टी बाहेर पडल्यामुळे शोच्या रेटिंगला फटका बसू शकतो.

यंदा बिग बॉस हिट शो लोकांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरला आहे. सलमान खानचा चार्मही बिग बॉससाठी हिट ठरू शकला नाही. आता शमिता शोमधून बाहेर गेली की नाही. तसेच ती बाहेर आल्यावर शोच्या टीआरपीवर किती फरक पडतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -