घरमनोरंजनमी अंकुशला विसरून गेलो...'महाराष्ट्र शाहीर' चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

मी अंकुशला विसरून गेलो…’महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

Subscribe

बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट नुकताच 28 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित असून त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. शिवाय चित्रपटाचं आणि चित्रपटातील गाण्यांचं कौतुक देखील करत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलं असून अभिनेता अंकुश चौधरी यात शाहीर साबळे यांची मुख्य भूमिका साकारलेली आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील 30 एप्रिल रोजी त्यांच्या पत्नी प्रतिभाताई यांच्यासोबत हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी चित्रपटाचे कौतुक करत याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्र शाहीरच्या इंस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात या चित्रपटातील संपूर्ण टीमसोबत शरद पवार आणि त्यांच्या पत्नी देखील दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत खाली कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलंय की, “मा. शरद पवार आणि प्रतिभाताई यांनी महाराष्ट्र शाहीर चित्रपट पाहून संपूर्ण टीमचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या! ते म्हणाले, शेवटचं गाणं सुरु झालं आणि मी अंकुशला विसरून गेलो पूर्णतः मला फक्त शाहीर साबळे दिसले..धन्यवाद साहेब!”

 

- Advertisement -

हेही वाचा :

भाईजानला आता ‘अब्बा’ होण्याची इच्छा; पण…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -