घरमनोरंजनशाहरूख सोबतचा जुना फोटो शेअर करत बिग बींनी दिले 'डॉन 3' चित्रपटाचे...

शाहरूख सोबतचा जुना फोटो शेअर करत बिग बींनी दिले ‘डॉन 3’ चित्रपटाचे संकेत

Subscribe

अमिताभचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "आणि...अरे पुन्हा त्याच उत्साहात येत आहे मी..डॉन"

आपल्या 44 वर्ष जुन्या चित्रपट डॉनच्या पोस्टरवर सही करतानाचा एक फोटो अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. या फोटोमध्ये अमिताभ बच्चनसोबत अभिनेता शाहरूख खान सुद्धा उभा आहे. मात्र हा फोटो पाहिल्यानंतर शाहरूखच्या चाहत्यांनी फरहान अख्तरला चांगलंच धारेवर धरलंय. कारण याआधी शाहरूखला सोबत घेऊन फरहान अख्तरने ‘डॉन’ चित्रपट आणि त्याचा दुसरा सिक्वेलही बनवलेला आहे, मात्र आता या गोष्टीला अनेक काळ लोटून गेला. फरहान अख्तर ‘डॉन 3’ चित्रपटाची अनाउंसमेंट कधी करणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

 अमिताभचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “आणि…अरे पुन्हा त्याच उत्साहात येत आहे मी..डॉन”. या कॅप्शन आणि फोटोमुळे असं दिसून येतंय की, येत्या काळात अमिताभ आणि शाहरूख पुन्हा डॉनचा तिसरा सिक्वेल चाहत्यांसाठी घेऊन येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

- Advertisement -

 मागील काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर 1978 मधील ‘डॉन’ चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर जमलेल्या प्रेक्षकांच्या गर्दीचा फोटो शेअर केला होता. या खास पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट देखील केल्या आहेत, तसेच काहींनी अमिताभचे कौतुकही केले होते. मागे हा फोटो अचानक शेअर केल्यामुळेच चाहत्यांना ‘डॉन 3’ येईल अशी हिंट मिळाली होती.

 


हेही वाचा :मालदीवमध्ये मुलीला सोबत घेऊन अनुष्का शर्माने चालवली सायकल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -