घरताज्या घडामोडीSidharth Shuklaच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा हसताना दिसली शेहनाज गिल

Sidharth Shuklaच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा हसताना दिसली शेहनाज गिल

Subscribe

प्रेक्षक आजही सिदनाजच्या जोडीला मिस करत आहेत.

बॉलिवूड दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर कोलमडून गेलेली त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री शेहनाज गिल गेल्या अनेक महिन्यांपासून लाइम लाइटपासून दूर होती. सिद्धार्थच्या जाण्याने शेहनाजला मोठा मानसिक धक्का बसला ज्यातून तिला सावरायला अनेक माहिने गेले. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज पहिल्यांदाचा पब्लिक प्लेसवर छान हसताना दिसली. तिला हसताना पाहून तिचे फॅन्सही आनंदी झाले आहेत. मधल्या काळात सिद्धार्थ आणि शेहनाज यांच्यावर चित्रीत झालेली गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली. प्रेक्षक आजही सिदनाजच्या जोडीला मिस करत आहेत. आजही सोशल मीडियावर दोघांचे तितकचं फॅन फॉलोव्हिंग आहे.

- Advertisement -

शेहनाजने नुकतीच एक अनाथालयाला भेट दिली.तिथे असलेल्या लहान लहान मुलांना ती भेटली त्यांच्याशी गप्पा मारल्या. दरम्यानचा शेहनाजचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात शेहनाज फार रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. मात्र तिच्या चेहऱ्यावरची नाराजीही दिसली. शेहनाज ऑक्टोबर महिन्यात ‘हौसला रख’ या सिनेमाचे शुटींग पूर्ण करण्यासाठी लंडनला गेली होती. त्यानंतर पहिल्यांदा शेहनाजला अनाथालयात स्पॉट करण्यात आलं.

- Advertisement -

शेहनाज तिच्या सोशल मीडियावरुन सिद्धार्थच्या अनेक आठवणी कायम शेअर असते. सिद्धार्थला डेडिकेट केलेलं गाण शेहनाजने स्वत: गायल होतं. शेहनाजच्या गाण्यातून तिचं सिद्धार्थवर असलेलं प्रेम पुन्हा एकदा प्रेक्षकांना पहायला मिळालं. बॉग बॉस१३ मध्ये सिद्धार्थ शेहनाजच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. सिद्धार्थच्या जाण्याने प्रेक्षकांमध्ये देखील सिद्धार्थची कमी जाणवत आहे.

१२ डिसेंबरला सिद्धार्थ शुक्लाचा वाढदिवस असतो. यादिवशी सिद्धार्थच्या आवाजातलं रॅप साँग रिलीज करणार आहेत. हे गाणं कसं असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.


हेही वाचा – Vicky Kaushal Katrina Kaif Wedding: काय सांगता! कतरिनाने लग्नासाठी बुक केलीय १४ लाखांची सुईट

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -