घरमनोरंजनसहि पकडे पै, भाभीजी काँग्रेस मे है

सहि पकडे पै, भाभीजी काँग्रेस मे है

Subscribe

अभिनेत्री शिल्पा शिंदे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर है’ मधून घराघरात पोहोचलेली आणि नंतर ‘बिग बॉस ११’ ची विजेती ठरलेली अभिनेत्री शिल्पा शिंदेने काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी अभिनेत्री ईशा कोपीकरने देखील राजकारणात प्रवेश केला असून तिने भाजपला पसंती दर्शवली आहे.

वाचा – ‘खल्लास गर्ल’ ईशा कोप्पीकरची भाजपमध्ये एन्ट्री

- Advertisement -

पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी शिल्पा शिंदे म्हणाल्या की, “लोक मला अभिनेत्रीच्या रुपात पाहतात, मात्र मला देखील देशाप्रती आपले प्रेम आहे, हे दाखण्यासाठी काम करायचे आहे. काँग्रेस हा असा पक्ष आहे जो फार पुर्वीपासून देशाची सेवा करत आहे, त्यामुळेच मी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. सध्या देशाला परिवर्तन हवे आहे, हे परिवर्तन फक्त काँग्रेस पार्टीच आणू शकते. मी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाने देखील माझे स्वागत केले, याबद्दल मी त्यांची आभारी आहे.”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्याला मागे मदत केली होती, त्यामुळे मनसे पक्ष का नाही निवडला? असा प्रश्न शिल्पा शिंदेंना पत्रकारांनी विचारला. यावर त्या म्हणाल्या की, “काँग्रेस पक्ष हा कोणताही प्रादेशिक, जातीय भेद न मानता प्रत्येकाच्या मदतीला धावून जातो. तर मनसे फक्त मराठीच्या मुद्द्यावर भांडते. मला देखील केवळ मराठी या दृष्टीकोनातूनच त्यांनी मदत केली होती.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -