घरमनोरंजन१०० टक्के येणार ‘सैराट २’, अशी आहे कथा

१०० टक्के येणार ‘सैराट २’, अशी आहे कथा

Subscribe

पुण्याच्या चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात ‘सैराट २’ या शीर्षकाची नोंदणी करण्यात आली असून, चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेल्या ‘सैराट’ चित्रपटाचा सिक्वल कधी येणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. नुकतंच यावर शिक्कामोर्तब झालं असून ‘सैराट २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, सैराट चित्रपटाचा निर्माता-दिग्दर्शक नागराज मंजुळे ‘सैराट २’ची निर्मीती करत आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, पुण्यामध्ये सैराट २ च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. इतकंच नाही तर पुण्याच्या चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात ‘सैराट २’ या शीर्षकाची नोंदणीदेखील करण्यात आली आहे. त्यामुळे आता १०० टक्के ‘सैराट २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हमजे सैराट २ मध्ये कोणते कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार, या नव्या भागाची कथा काय असणार? याचाही उलगडा झाला आहे. सैराट चित्रपटाच्या पहिल्या भागाने मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड रचला. या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीतील अनेक रेकॉर्ड मोडले आणि अनेक नवे रेकॉर्ड प्रस्थापितही केले. महाराष्ट्रातील लहानातल्या लहान गावापासून ते मोठ्या शहरांपर्यंत सगळीकडेच चित्रपटाने बक्कळ कमाई केली. याच चित्रपटामुळे ‘रिंकू राजगुरु’ आणि ‘आकाश ठोसर’ हे दोघं रातोरात सुपरस्टार झाले.

अशाप्रकारे एकाहून एक विक्रम रचत मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणाऱ्या ‘सैराट’च्या दुसऱ्या भागाविषयी लाखो लोक उत्सुक होते. मात्र, अखेर त्यांची ही उत्सुकता आता संपली असून ‘सैराट २’ची अधिकृत घोषणा झासी आहे.

- Advertisement -

अशी आहे सैराट २ ची गोष्ट…

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सैराट २ ही आर्ची आणि परश्याचा मुलगा मोठा झाल्यानंतरची कथा आहे. ज्याप्रमाणे आर्ची आणि परशा हैदराबादला पळून आल्यावर सुमन अक्का (छाया कदम) त्यांची काळजी घेते, त्याचप्रमाणे ती त्यांच्या मुलाचं संगोपन करताना दाखवण्यात येणार आहे. कथानकानुसार, त्यानंतर आर्ची-परशाचया मुलाचा ताबा त्याच्या मावशीकडे देण्यात येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, या मुलाच्या मावशीची भूमिका अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (सिनीअर) साकारणार आहे. आता या माहितीमध्ये कितपत तथ्य आहे, हे ‘सैराट २’चा टिझर किंवा ट्रेलर आल्यावरच समजेल. आता ढोबाळमानाने चित्रपटांमध्ये दाखवलं जातं त्याप्रमाणे आर्ची आणि परशाचा मुलगा मोठा होऊन, आपल्या आई-वडिलांच्या खुनाचा बदला घेणार? की दुसऱ्या भागाच्या कथानकातून नागराज काही वेगळाच संदेश प्रेक्षकांना देणार… हे चित्रपट प्रदर्शनानंतरच उघड होईल.


वाचा: Thackeray ट्रेलरवर अभिनेता सिद्धार्थ नाराज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -