‘योद्धा’मध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा दमदार लुक

शेरशाहच्या दमदार सक्सेसनंतर सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

sidharth malhotra yodha movie motion poster release
'योद्धा'मध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा दमदार लुक

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणजेच सिद्धार्थ मल्होत्रा सध्या बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता म्हणून ओळखला जात आहे. सिद्धार्थने मधल्या काळात दिलेल्या दमदार सिनेमांमुळे सिद्धार्थ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. शेरशाहच्या दमदार सक्सेसनंतर सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘योद्धा’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार आहे ज्यात सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करण जोहरने या सिनेमाचा पहिला लुक शेअर केला आहे. ज्यात सिद्धार्थ मल्होत्रा एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे.

करणने त्याच्या सोशल मीडियावरुन सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. मोशन पोस्टरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा एका विमानात रेस्क्यू ऑपरेशन करताना दिसत आहे. सिनेमाचा हा पहिला लुक पाहूनच अंगावर काटा उभा राहतो. सिद्धार्थच्या हातात बंदूक आहे यावरुनच हा अॅक्शन मोड सिनेमा असल्याचे लक्षात येत आहे. ११ नोव्हेंबर २०२२मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

करण जोहरने सिनेमाचा पहिला लुक शेअर करत, शिखरांवर विजय मिळवल्यानंतर धर्मा प्रोडक्शनची पहिली फ्रेंचायसीमध्ये सिद्धार्थ मल्होत्राच्या पावरफूल अंदाजात आम्ही येत आहोत असे करणने म्हटले आहे.

सिद्धार्थच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचे झाले तर लवकरच ‘थँक गॉड’ या सिनेमात सिद्धार्थ दिसणार आहे. या सिनेमात अभिनेता अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह यांच्या महत्त्वाच्या भूमिका पाहता येणार आहेत. तसेच सिद्धार्थ पोलिसांवर आधारित एका वेब सीरिजमध्ये निर्माता रोहित शेट्टीसोबत काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. या वेब सीरिजविषयी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.


हेही वाचा – प्रियांकाचा पती निक जोनसचा वयाच्या १३ व्या वर्षापासून डायबिटीजशी लढा, शेअर केली भावनिक पोस्ट