Wednesday, September 22, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी सुप्रसिद्ध गायक कुमार सानू कोरोना पॉझिटिव्ह

सुप्रसिद्ध गायक कुमार सानू कोरोना पॉझिटिव्ह

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. कुमार सानू यांचे मॅनेजर जगदीश भारद्वाज यांनी त्यांना कोरोना झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे. बॉलिवूडमध्ये ९० दशकात कुमार सानू यांच्या आवाजातील दर्दभरे गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली. कुमार सानू यांच्या ९०च्या दशकातील गाण्यांवर आताही तितेकच प्रेम केले जाते. त्यामुळे कुमार सानू यांचा फॅन ग्रुप खूप मोठा आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर सध्या ट्विटवर कुमार सानू यांच्या नावाने ट्रेंड सुरू झाला आहे.

सानू यांच्या मॅनेरजने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी १० वाजता अमेरिकेतील लॉस अँजिल्स शहरात दुबईच्या मार्गाने कुमार सानू जाणा होते. कोरोनाचा काळ असल्यामुळे विमान प्रवास करण्यापूर्वी तपासणी केली जाते. या तपासणी दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सानू यांचे अमेरिकेला जाणे रद्द झाले आहे. सानू यांना महापालिकेने क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

Unfortunately Sanuda has tested Corona positive, please pray for his good health. Thank you🙏 Team KS

Posted by Singer Kumar Sanu on Thursday, October 15, 2020

 

- Advertisement -

दरम्यान अमेरिकेतील लॉस अँजिल्स शहरात कुमार सानू यांची पत्नी सलोनी आणि त्यांच्या दोन मुली सनाव एना राहत आहेत. म्हणून ते अमेरिकेला दर महिन्याला त्यांना भेटायला जातात. पण कोरोनामुळे ते गेले ९ महिने अमेरिकेला गेले नव्हते. त्यामुळे ते पत्नी आणि मुलींना भेटण्यासाठी अमेरिकेला निघाले होते. पण त्यादरम्यान ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले.


हेही वाचा – भारतातील पहिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या भानू अथैय्या यांचे निधन


 

- Advertisement -