Smart Jodi : अंकिता लोखंडे आणि विक्की जैनने पटकावले ‘स्मार्ट जोडी’चे विजेतेपद

नुकताच 'स्मार्ट जोडी'चा अंतिम टप्पा पार पडला. विजेते पद मिळवण्याठी अनेक जोडप्यांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. मात्र या दरम्यान अंकिता लोखंडे आणि विक्की जैनने बाजी मारून विजेतेपद मिळवले.

हिंदी टेलिव्हिजनवरील ‘स्मार्ट जोडी’ हा रियालिटी शो गेल्या काही दिवसांपासून चालू होता. मात्र आता हा शो संपलेला असून या शोच्या विजेत्या जोडीची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विक्की जैन यांनी ‘स्मार्ट जोडी’ या रियालिटी शोचे विजेते पद जिंकलेले आहे.

अंकिता आणि विक्की ठरले स्मार्ट कपल
अंकिता लोखंडे आणि विक्की जैनने अंतिम फेरीमध्ये बलराज दीप्ति आणि नेहा स्वामी अर्जुन बिजलानी यांच्याशी स्पर्धा केली असून गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेल्या या रियालिटी शोचे हे विजेते पद मिळवले. नुकताच ‘स्मार्ट जोडी’चा अंतिम टप्पा पार पडला. विजेते पद मिळवण्याठी अनेक जोडप्यांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. मात्र या दरम्यान अंकिता लोखंडे आणि विक्की जैनने बाजी मारून विजेतेपद मिळवले.

सगळ्या जोड्यांना मागे टाकून अंकिता आणि विक्कीने पटकावले विजेतेपद


‘स्मार्ट जोडी’च्या सुंदर ट्रॉफीसोबतच अंकिता लोखंडे आणि विक्की जैनला 25 लाख बक्षीस म्हणून मिळाले. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात अंकिता आणि विक्की शिवाय बलराज-दीप्ति आणि भाग्यश्री-हिमालय दस्सानी ह्या जोड्या टॉप 3 मध्ये होत्या. मात्र बाकी इतर जोड्यांना मागे टाकत अंकिता आणि विक्की ‘स्मार्ट जोडी’ बनले.

गेल्या वर्षी झालं होतं लग्न
अंकिता लोखंडे आणि विक्की जैनचे लग्न गेल्या वर्षी 14 डिसेंबर रोजी मुंबई येथे झाले होते. लग्न झाल्यापासून अंकिता आणि विक्कीची जोडी सोशल मीडियावर चर्चेत असते.

 


हेही वाचा :http://‘Jawan’ नंतर शाहरूख खान करणार ‘Don 3’ चित्रपटाची तयारी