घरताज्या घडामोडीसोनू निगम धक्काबुक्कीप्रकरणी ठाकरे गटातील आमदाराच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

सोनू निगम धक्काबुक्कीप्रकरणी ठाकरे गटातील आमदाराच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

मागील काही दिवसांपासून बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक सोनू निगम हा चर्चेत आहे. सोनू निगमला चेंबूरमधील एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याचं समोर आलं आहे. चेंबुरमधील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान सोनू निगमला धक्काबुक्की करण्यात आली होती. परंतु ही धक्काबुक्की करणारा ठाकरे गटातील आमदाराचा मुलगा असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या मुलाने गायक सोनू निगम याच्यासोबत धक्काबुक्की केल्याचे बोलले जात आहे. स्वप्नील फातर्फेकर असं आमदाराच्या मुलाचं नाव आहे. स्वप्नील फातर्फेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो कामानिमित्ताने बाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

सोनू निगम धक्काबुक्की प्रकरणी चेंबूर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. चेंबूर पोलीस या प्रकरणातील तपास करत असून सर्व तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम करत आहेत. चेंबूर पोलीस लवकरच त्याला चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले होते. परंतु या कार्यक्रमामध्ये सोनू निगमला धक्काबुक्की करण्यात आली. हा कार्यक्रम झाल्यानंतर सोनू स्टेजवरून खाली उतरत असताना आमदार फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील याच्याकडून सोनू निगम, त्याचा मित्र आणि सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की करण्यात आली. परंतु या धक्काबुक्कीत सोनू निगमच्या मित्राला आणि सुरक्षा रक्षकाला दुखापत झाली होती. त्यानंतर सोनूने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आता पोलिसांकडून स्वप्नील फातर्फेकर याची चौकशी करण्यात येणार आहे.


हेही वाचा :सोनू निगमवरील हल्ल्यानंतर गायक शानने ISRAला लिहिले पत्र


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -