घरमहाराष्ट्र'फडणवीस म्हणाले, शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं नाही ही चूक होती'; विक्रम...

‘फडणवीस म्हणाले, शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं नाही ही चूक होती’; विक्रम गोखलेंचा दावा

Subscribe

भाजप-शिवसेना यांच्यात युती झाली नाही. त्याबाबत मी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद का दिलं नाही? असा सवाल मी फडणवीसांना केला. त्यावर त्यांनी उत्तर देताना चूक झाल्याचं सांगितलं, असा खळबळजनक दावा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केला. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.

विक्रम गोखले यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्यावतीनं सन्मान करण्यात आला. यावेळी विक्रम गोखले यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना-भाजप युतीवर भाष्य केलं. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री दिलं असतं तर काय बिघडलं असतं? असा सवाल मी फडणवीसांना केला होता. तसंच, आधीची अडीच वर्ष वर्ष तुम्हाला हवी की नंतरची हवी? असा प्रश्न देखील मी फडणवीसांना केला होता. त्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी चूक झाली असं मला सांगितलं, असा दावा विक्रम गोखले यांनी केला.

- Advertisement -

केवळ फडणवीसांची चूक नाही

खरं तर एकट्या देवेंद्र फडणवीस यांची चूक नाही. त्यांच्यात जे काही झालं होतं, त्याबाबत त्यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. लोकांना फसवू नका तुम्ही. लोक केव्हा तरी प्रचंड शिक्षा करतात. ती आता आपण भोगत आहोत, असं विक्रम गोखले म्हणाले.

शिवसेना-भाजपने एकत्र यायलाच हवं

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या कारणाकरिता शिवसेना स्थापन केली. त्या बाळासाहेबांच्या मनाला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. सध्याचं जे गणित आहे ते चुकलेलं आहे. हे सुधारायचं असेल तर शिवसेना आणि भाजप एकत्रं आल्याशिवाय पर्याय नाहीच. हे दोन पक्ष एकत्र येण्यासाठी मध्यस्थी करायला देखील तयार आहे, असं विक्रम गोखले म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेना-भाजपने एकत्र यायलाच हवं, मध्यस्थीसाठी मी तयार – विक्रम गोखले


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -