Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त खुशी कपूरची खास पोस्ट

श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त खुशी कपूरची खास पोस्ट

Subscribe

बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीला या जगाचा निरोप घेऊन 5 वर्ष झाली. 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईतील एका हॉटेलमध्ये तिचे आकस्मिक निधन झाले. मृत्यूच्या इतक्या वर्षानंतरही श्रीदेवी चाहत्यांच्या स्मरणात आहे. श्रीदेवीचे चित्रपट आजही प्रेक्षक आवर्जून पाहतात. आज श्रीदेवीचा 60 वा वाढदिवस आहे. 13 ऑगस्ट 1963 रोजी श्रीदेवीचा जन्म झाला होता. आज श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त अनेकजण तिच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अशातच, श्रीदेवीच्या दोन्ही मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूरने आईच्या वाढदिवसानिमित्त जुना फोटो शेअर केला आहे.

खुशी कपूरची पोस्ट

Sridevi Janhvi Khushi

- Advertisement -

खुशीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिने जान्हवी आणि श्रीदेवीसोबता एक जुना फोटो शेअर केला आहे. ज्यावर

 

View this post on Instagram

 

A post shared by Boney.kapoor (@boney.kapoor)

तिने “हॅप्पी बर्थडे मम्मा” असं लिहिलं आहे. तर बोनी कपूर यांनी देखील श्रीदेवीसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

1996 मध्ये श्रीदेवी आणि बोनी कपूरचं झालं होतं लग्न

- Advertisement -

1984 साली बोनी कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटात श्रीदेवींना सीमाची भूमिका ऑफर केली. त्यानंतक श्रीदेवींच्या आईच्या आजारपणात आणि नंतर त्यांच्या मृत्यूदरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली. आईच्या निधनानंतर श्रीदेवी खूप एकाकी झाल्या आणि त्यावेळी बोनी कपूर त्यांचा आधार झाले होते. मग दोघांमधील प्रेम आणखी वाढले. श्रीदेवींना 1993 साली प्रपोज केलं. जेव्हा बोनी कपूर श्रीदेवींच्या प्रेमात पडले तेव्हा त्याचं लग्न झालं होतं आणि त्यांना दोन मुलंही होती. पण श्रीदेवीशी लग्न करण्यासाठी त्यांनी पहिली पत्नी मोना कपूरशी घटस्फोट घेतला. त्यानंतर दोघांनी 2 जून 1996 रोजी लग्न केलं.


हेही वाचा : Photo : तू आजही तितकीच सुंदर… काजोलच्या फोटोवर चाहत्याची कमेंट

- Advertisment -