घर महाराष्ट्र 'या' चित्रपटातील सीन शेअर करत सचिन सावंत यांचे अजित पवारांवर शरसंधान

‘या’ चित्रपटातील सीन शेअर करत सचिन सावंत यांचे अजित पवारांवर शरसंधान

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांची पुण्यातील एका बड्या उद्योगपतीच्या बंगल्यावर भेट झाली. त्यावरून निरनिराळे तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरून एका चित्रपटातील एक सीन शेअर करत अजित पवार यांच्यावर शरसंधान केले आहे.

- Advertisement -

चांदणी चौक पूल लोकार्पणासाठी काल, शनिवारी केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुण्यात होते. त्यासोबतच वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, राजेश टोपे, मंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील पुण्यात होते. यामुळे पुण्यात मोठया राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे होती. त्यानुसार एका बड्या उद्योगपतीच्या घरी पवार काका – पुतण्याची गुप्त बैठक झाली.

हेही वाचा – ‘पहाटेच्या शपथविधीप्रमाणे अजित पवार परत फिरणार’; राऊतांचा गौप्यस्फोट

- Advertisement -

काका – पुतण्याच्या या भेटीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकारणात भूकंप येण्याची शक्यता वर्तविली. तर, अशा भेटीमुळे सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, असे मत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले. तर, पहाटेच्या शपथविधीप्रमाणे मागे फिरा, असं सांगण्यासाठी शरद पवार हे अजित पवारांना भेटले असतील, असे म्हणत, राज्याच्या राजकारणात लवकरच मोठी उलथापालथ होईल, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

हेही वाचा – अजित पवार-शरद पवार यांच्या भेटीबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले… 

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरून ‘दुल्हे राजा’ या चित्रपटातील एक सीन शेअर केला आहे. त्यात कादर खानच्या फाइव्ह स्टार हॉटेलचा मॅनेजर जॉनी लिव्हर हॉटेलसमोरील अभिनेता गोविंदाच्या धाब्यावर जातो, असा हा सीन आहे. हा व्हिडीओ ट्वीट करताना, अजित पवार गटाची सद्यस्थिती अशी आहे का? असा सवालही सचिन सावंत यांनी केला आहे.

- Advertisment -