घरमनोरंजनजिया खान आत्महत्याप्रकरणी सुटका झाल्यानंतर सूरज पांचोलीने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

जिया खान आत्महत्याप्रकरणी सुटका झाल्यानंतर सूरज पांचोलीने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

Subscribe

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी शुक्रवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला. कोर्टाने बॉलिवूड अभिनेता आणि जिया खान प्रकरणातील आरोपी मानला जाणारा जियाचा प्रियकर सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता केली. 10 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला. या निकालानंतर सूरज सध्या प्रचंड चर्चेत आहे. दरम्यान अशातच सूरज पांचोलीचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये तो मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे दिसत आहे.

सूरज पांचोलीने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

सोशल मीडिया सध्या सूरज पांचोलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात सूरज मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पूजा करताना दिसत आहे. जिया खान आत्महत्येप्रकरणी निर्दोष सुटल्यानंतर अभिनेता सूरज पांचोलीने आज संध्याकाळी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले. यासोबतच 10 वर्षांनंतर या प्रकरणातून सुटका झाल्याबद्दल सूरजने बाप्पाचे आभार मानले.

 

View this post on Instagram

 

A post shared by TAHIR JASUS007 (@tahirjasus)

- Advertisement -

जिया खानच्या आत्महत्येनंतर अभिनेता सूरज पांचोलीचे नाव चर्चेत चांगलेच चर्चेत आले होते. गेल्या 10 वर्षांपासून सूरज या केसमुळे त्रस्त होता, अखेर सूरजला त्यातून दिलासा मिळाला आहे.

निकालानंतर सूरजची प्रतिक्रिया

शुक्रवारी निर्दोष सुटल्यानंतर पत्रकारांना सूरजने पहिली प्रतिक्रिया दिली यावेळी तो म्हणाला की, “या निकालाचे 10 वर्ष माझ्यासाठी खूप वेदनादायक होते. पण आज मी केवळ माझ्याविरुद्धचा हा खटला जिंकला नाही तर माझा सन्मान आणि आत्मविश्वासही परत मिळवला आहे, अशा घृणास्पद आरोपांसह जगाला सामोरे जाण्यासाठी खूप धैर्य हवे होते. मी आशा करतो आणि देवाला प्रार्थना करतो की एवढ्या लहान वयात मी ज्या गोष्टीतून गेलो ते कोणीही करू नये, मला माहित नाही की माझ्या आयुष्यातील ही 10 वर्षे मला कोण परत देईल, परंतु मला आनंद आहे की हे शेवटी मला यश मिळाले फक्त माझ्यासाठीच नाही तर खास माझ्या कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण आहे.” असं सूरज म्हणाला.

- Advertisement -

हेही वाचा :

“चला हवा येऊ द्या” मध्ये होणार गौर गोपाळ दास यांचे आगमन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -