घरताज्या घडामोडीSushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीला वर्षभरानंतर कोर्टाकडून दिलासा

Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्तीला वर्षभरानंतर कोर्टाकडून दिलासा

Subscribe

मागील वर्षी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) रियावर कारवाई करून अटक केली होती. यामुळे रियाला काही दिवस तुरुंगात काढावे लागले. एवढेच नाहीतर एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सब्सटेंड अॅक्ट) कोर्टाने रियाचे बँक अकाऊंट गोठवले (फ्रीज) आणि गरजेचे सामान जप्त करण्यात आले होते.

आता एका वर्षानंतर रिया चक्रवर्ती आणि तिचा चाहत्यांना खुशखबर दिली आहे. एनडीपीएस कोर्टाने रिया चक्रवर्तीचे बँक अकाऊंट डीफ्रीज करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, एनडीपीएस कोर्टाने एनसीबीला आदेश दिले आहे की, रिया चक्रवर्तीचे बँक अकाऊंट डिफ्रीज करा, जे गेल्या वर्षभरापासून एजेंसीने फ्रीज केले होते.

- Advertisement -

एनडीपीएस कोर्टाने एनबीसीला हा आदेश रिया चक्रवर्तीची याचिका ध्यानात घेऊन दिला आहे. माहितीनुसार रिया चक्रवर्तीने एनडीपीएस कोर्टात याचिका दाखल करून आपले बँक अकाऊंट डिफ्रीज करण्याची विनंती केली होती. याचिकेच्या माध्यमातून रिया म्हणाली होती की, ती पेशाने एक कलाकार आहे. एनसीबीने कोणत्याही कारणाशिवाय १६/०९/२०२० पासून तिचे बँक अकाऊंट आणि एफडी फ्रीज केले आहेत.

पुढे याचिकेत म्हटले आहे की, तिला कर्मचाऱ्यांचे वेतन आणि जीएसटीसारखे व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँक अकाऊंट गरजेचे आहे. तिचा भाऊ तिच्यावर अवलंबून आहे आणि ती स्वतःच्या खर्चासाठी बँक अकाऊंटमध्ये पैसे ठेवते. परंतु १० महिन्यांपासून अभिनेत्रीचे बँक अकाऊंट फ्रीज आहे, ज्यामुळे तिला समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे बँक अकाऊंट डीफ्रीज केले पाहिजे.

- Advertisement -

रियाने दुसऱ्या एका याचिकेत आपले गॅझेट, मॅकबुक प्रो अॅपल लॅपटॉप आणि अॅपल आयफोन परत करण्याची मागणी केली आहे. कोर्टाने यावर आदेश दिले की, योग्य पडताळणीनंतर गॅझेट ‘सुपुर्तनाम’वर रिया चक्रवर्तीला परत केले जाईल आणि एक लाख रुपयांचा नुकसान भरपाई बाँड अंमलात आणला जाईल.


हेही वाचा – तुरुंगातून बाहेर आल्यानंतर Aryan Khan झालाय अबोल


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -