घरताज्या घडामोडीतुरुंगातून बाहेर आल्यानंतर Aryan Khan झालाय अबोल

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर Aryan Khan झालाय अबोल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान काही दिवसांपूर्वी आयुष्यातील कठीण प्रसंगातून जात होते. कारण यादरम्यान त्यांचा मुलगा आर्यन खान तुरुंगात दिवस काढत होता. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यनला अटक केली होती. आर्यनवर ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप करण्यात आला होता, त्यामुळे त्याला आर्थररोड जेलमध्ये २५ दिवस काढावे लागले. २८ ऑक्टोबरला आर्यनला या प्रकरणात जामीन मिळाला आणि शाहरुख-गौरी यामुळे दिलासा मिळाला. आता आर्यन खान घरी परतला आहे, परंतु आर्यन याप्रकरणामुळे घाबरला आहे आणि तो एकटाच वेळ घालवत आहे, असे खान कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

माध्यमांच्या वृत्तानुसार, आर्यन आता खूप गप असतो आणि स्वतःमध्ये हरवलेला असतो. तो दिवसभर आपल्या खोलीत असतो. त्याला कोणालाही भेटण्यात रस नसतो. आर्यन पहिल्यापासूनच खूप गप आहे. परंतु आता तो आणखीनच शांत झाला आहे. आर्यनला जामीन मिळून जवळपास १० दिवस झाले आहेत. पण तो अजूनही नॉर्मल झाला नाही. खान कुटुंबिय आर्यनवर कोणताच दबाव टाकत नाही. त्याला रिकव्हर होण्यासाठी वेळ दिला आहे.

- Advertisement -

अलीकडेच काही माध्यमांच्या वृत्तामधून समोर आले होते की, शाहरुखला आर्यनच्या सुरक्षेची चिंता आहे. शाहरुख सध्या योग्य सुरक्षा रक्षकाच्या शोधात आहे. आता आर्यनच्या सुरक्षेची जबाबदारी शाहरुखचा सुरक्षारक्षक रवि घेतली आहे. पण लवकरच शाहरुखसोबत तो पठान चित्रपटाच्या शूटिंगसाठी रवाना होणार आहे. त्यामुळे शाहरुख आर्यनसाठी एका चांगल्या सुरक्षा रक्षकाच्या शोधात आहे.


हेही वाचा – Antim Song Hone Laga Video: भाईजानच्या ‘अंतिम’ चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -