घरताज्या घडामोडीसुशांत आत्महत्याप्रकरण: मी माघार घेतोय - शेखर सुमन

सुशांत आत्महत्याप्रकरण: मी माघार घेतोय – शेखर सुमन

Subscribe

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर अभिनेतेला न्याय मिळावा अशी मागणी करणारे अनेक सेलेब्स व नेते होते. हे प्रकरण केवळ आत्महत्येपुरते मर्यादित ठेवणे त्यांनी चुकीचे मानले. याची सुरूवात अभिनेता शेखर सुमनने केली.  ज्यांनी सुशांतला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर मोहीम राबविली. पण आता सुशांतच्या मृत्यूला एक महिना झाला आहे, शेखर सुमनची ही लढाई थोडी कमकुवत होताना दिसत आहे.

- Advertisement -

आता शेखर सुमन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी या प्रकरणातून स्वत:ला दूर ठेवत आहे. कारण कुटुंबच शांत आहे तर दुसरं कोणी न्यायाबद्दल कोणी कसं बोलू शकेल. असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ज्यांनी ही मोहिम मोठी केली त्यांचे मी आभार मानतो. पण आता मी या प्रकरणात थोडं मागे जात आहे. कुटुंब पूर्णपणे शांत आहे,  ही गोष्ट मला त्रास देत आहे. मी अस्वस्थ आहे शांत राहणे हा त्यांचा अधिकार आहे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे.

- Advertisement -

दुसर्‍या ट्विटमध्ये शेखर सुमन यांनी आशा व्यक्त केली आहे की सुशांत प्रकरणातून संपूर्ण जगाला आपली एकता पाहण्याची संधी मिळेल. आता जेव्हा शेखर सुमनचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले, तेव्हा सर्वांना वाटायला लागले की आता सुशांतला न्याय मिळवून देणारा कमी झाला आहे, तर शेखर सुमन यांचे आणखी एक ट्विट आले.

शेखर ट्विटमध्ये म्हणतात, मी पुन्हा विचार केला आणि मला समजले की आपण बर्‍याच लोकांच्या भावना दुखावू शकत नाही. मला ही लढाई लढावी लागेल. जर कुटुंब एकत्र आले नाही तर सुशांत ही एक व्यक्ती होती आणि आम्ही त्याच्यासाठी लढा देत होती.


हे ही वाचा – सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी होणार ‘भाईजानची’ चौकशी?


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -