घरमनोरंजनवयाची ४५ वर्षे गाठेपर्यंत माझ्याकडून अनेक मोठ्या चुका, सुष्मिता सेनची सोशल मिडियावर...

वयाची ४५ वर्षे गाठेपर्यंत माझ्याकडून अनेक मोठ्या चुका, सुष्मिता सेनची सोशल मिडियावर कबुली

Subscribe

सुष्मिताच्या वेब सिरिज मधील भूमिकेची समीक्षकांनी तसेच प्रेक्षकांनी खूप प्रशंसा केली होती. आता सुष्मिता 'आर्या' सिरिजच्या पुढील भागात सुद्धा झळकणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिने आपल्या कलेच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपलं प्रस्थ निर्माण केलं आहे. सुष्मिता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या प्रत्येक पोस्ट वर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. आपल्या चाहत्यांसोबत कनेक्टेड राहायला सुष्मिताला आवडते. आपल्या प्रोफेशनल तसेच खाजगी आयुष्याबद्दलच्या बर्‍याचश्या अपडेट ती सोशल मीडियावर शेअर करते. नुकतच सुष्मिताच्या एका पोस्टची सगळीकडे खूप चर्चा रंगतांना दिसत आहे. तिने पोस्ट मध्ये लिहलं आहे की,” लोकं मला नेहमी विचारतात मी कधी सुट्टी घेते? तर माझं उत्तर आहे हा! नक्कीच मी सुट्टी घेते. सुष्मिता पुढे लिहते की, मी प्रत्येक वेळेस सकारात्मक असते? माझं उत्तर आहे ‘नाही मी अनेकदा प्रयत्न करते सकारात्मक राहण्याचा पण नाही राहू शकत.. वयाच्या 45 व्या वर्षी सुद्धा मी अनेक गोष्टी निवडण्यात चुकते,ज्यामुळे मला दुख: होते.”
सुष्मिताने भले मोठे कॅप्शन देत तिच्या मनातील गोष्टींचा उलगडा केला आहे. यासोबतच तिने स्वत: चा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

- Advertisement -

 

सुष्मिता सेनने 1994 मिस इंडियाची मानकरी झाली होती. यानंतर तिने बॉलिवूड मध्ये आपलं करियर घडवलं. सुष्मिता अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. सध्या सुष्मिता हॉटस्टार वरील ‘आर्या’ नावच्या वेब सिरिज मध्ये दिसली होती.ष्मिताच्या वेब सिरिज मधील भूमिकेची समीक्षकांनी तसेच प्रेक्षकांनी खूप प्रशंसा केली होती. आता सुष्मिता ‘आर्या’ सिरिजच्या पुढील भगत सुद्धा झळकणार आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – ‘शब्द माहिती असता तर एडिट केला असता’, युविकाच्या चौधरीच्या माफीनंतर पती प्रिन्सने मागितली माफी

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -