घरमनोरंजनतापसीच्या आईवडिलांनी व्यक्त केली तिच्या लग्नाची चिंता म्हणाले,आता कोणाशीही लग्न कर

तापसीच्या आईवडिलांनी व्यक्त केली तिच्या लग्नाची चिंता म्हणाले,आता कोणाशीही लग्न कर

Subscribe

तापसीने तीचे आई-वडील तीच्या लग्नासाठी खुप चिंता व्यक्त करत असल्याचे म्हंटलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu)एकापाठोपाठ एक हिट सिनेमा करत असल्याचे दिसतेय. तापसी सध्या अनेक चांगल्या कंटेटच्या तसेच आशयघन चित्रपटाची निवड करत आहे. तापसीला तिच्या व्यावसायिक आयुष्या व्यतीरीक्त इतर कोणत्याही गोष्टीबद्दल चर्चा करणे फारसे आवडत नाही. तापसी तीचे व्यक्तीगत आयुष्य स्वत: पुरतीचं मर्यादित ठेवते. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान तापसीने तीचे आई-वडील तीच्या लग्नासाठी खुप चिंता व्यक्त करत असल्याचे म्हंटलं आहे. तसेच तापसी पुढे म्हणाली माझे आई-वडील माझ्या मर्जी विरुद्ध माझे लग्न करणार नाही.

तापसीने कर्ली टेल्स या डिजीटल चॅनलवर दिलेल्या मुलाखती दरम्यान तिच्या आयुष्यातील महत्वपुर्ण गोष्टींचा उलगडा केला आहे. तापसी म्हणाली “माझ्या आईवडिलांना न आवडणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही. मी ज्याला आतापर्यंत डेट केलंय, त्यांना मी सांगितले आहे. मी नेहमीच असा विचार असतो की, जर मी त्या मुलाशी लग्न करू शकले, तरच मी त्यावर डेटिंगसाठी वेळ खर्च करू शकते. मला टाईमपास करण्यात काही रस नाही. माझ्या आईवडिलांना नेहमी मझी काळजी सतावते ते नेहमी मला बोलतात की तू लवकरात लवकर लग्न कर. कोणाशीही कर पण आधी लग्न कर. त्यांना माझ्या लग्नाची फार काळजी आहे. कदाचित फार उशीर झाला तर मी लग्नच करणार नाही, ही चिंता त्यांना सतावत असते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

- Advertisement -

समोर आलेल्या माहितीनूसार तापसी माजी बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक मॅथियास बोए याला डेट करत आहे. तसेच दोघेही एकत्र बाहेर व्हॅकेशन एंजॉय करण्यास जातात. पण दोघांनीही अद्याप रिलेशनशिपमध्ये असल्याचे घोषीत केलं नाहीये.
जेव्हा तापसीच्या घरी इनकम टॅक्स अधिकाऱ्यांची धाड टाकली होती तेव्हा तापसीला मॅथियासने पाठींबा दिला होता. तापसीच्या वर्क फ्रंटबाबतीत सांगायचे झाल्यास नुकतच तापसीचा ‘हसीन दिलरुबा’ सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमात तापसी सोबत विक्रांत मैसी, हर्षवर्धन राणे यांच्या मुख्य भूमिका होत्या.

- Advertisement -


हे हि वाचा – ईशा देओल करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक,‘रुद्र’ सिनेमात करणार अजय देवगणसोबत काम



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -