घरमनोरंजन'इमली' फेम हेतल यादवच्या कारला ट्रकने दिली जोरदार धडक

‘इमली’ फेम हेतल यादवच्या कारला ट्रकने दिली जोरदार धडक

Subscribe

‘इमली’ कार्यक्रमातील अभिनेत्री हेतल यादवचा कार अपघात झाल्याची मोठी बातमी समोर येत आहे. ही घटना रविवारी रात्री झाली असून सध्या हेतल ठीक आहे. खरंतर रविवारी रात्री शूटिंगवरुन घरी परतत होती त्यावेळी एका ट्रकने तिच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात हेतलला गंभीर दुखापत झालेली नाही.

एका वृत्तपत्राला या अपघाताबद्दल अभिनेत्री हेतल यादवने स्वतः सांगितले आहे. त्यावेळी ती म्हणाली की, रविवारी रात्री ठीक 8:45 च्या सुमारास शूटिंग पूर्ण करुन ती घरी परतत होती. घरी जात असतानाच्या हायव्हेवर एका मोठ्या ट्रकने माझ्या गाडीला मागून जोरात धडक दिली. हा ट्रक कारला धडक देत रस्त्याच्या किनाऱ्यापर्यंत घेऊन गेला. माझी कार पडणारच होती मी खूप हिंमत करुन कारला थांबवलं आणि माझ्या मुलाला फोन केला. मी मुलाला हा प्रकार पोलिसांपर्यंत पोचवण्यास सांगितला. या सर्व प्रकारानंतर हेतल दुसऱ्याच दिवशी शूटिंगला पोहोचली. सोशल मीडियावरुन तिने ती पूर्ण ठीक असल्याचे चाहत्यांना सांगितले.

- Advertisement -

हेतल इमलीमध्ये साकारतेय शिवानी राणाची भूमिका

 

View this post on Instagram

 

A post shared by Hetal Yadav (@hetalyadav13)

इमलीमध्ये हेतल यादल, शिवानी राणा ही भूमिका साकारत आहे. मागील 25 वर्षांपासून हेतल अभिनय क्षेत्राशी जोडलेली आहे. तिला सर्वात जास्त प्रसिद्धी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून मिळाली होती.

- Advertisement -

 


हेही वाचा :

छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणे माझे भाग्य… अक्षय कुमारची पोस्ट चर्चेत

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -