घरमनोरंजनछत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणे माझे भाग्य... अक्षय कुमारची पोस्ट चर्चेत

छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणे माझे भाग्य… अक्षय कुमारची पोस्ट चर्चेत

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार वारंवार त्याच्या नवनवीन चित्रपटांमुळे चर्चेत असतो. बॉलिवूडला एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर अक्षय येत्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ या चित्रपटामध्ये अक्षय छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तसेच अक्षयसारख्या बॉलिवूड अभिनेत्याला या चित्रपटामध्ये शिवरायांची भूमिका दिल्याबद्दल काही राजकीय पक्षांनी तसेच मराठी प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला होता.

चित्रपटाच्या शूटिंगला झाली सुरुवात

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

दरम्यान, अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि त्या फोटोच्या काचेवर अक्षयचे प्रतिबिंब दिसत आहे. या फोटोमध्ये अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांचा वंदन करताना दिसत आहे. या फोटोसह अक्षयने खाली कॅप्शन देखील लिहिलंय की, “आज माझ्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करत आहे. ज्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार असल्याने स्वतःला खूप भाग्यवान समजत आहे. मी त्यांच्या आयुष्याची प्रेरणा घेत आणि राजमाता जिजाऊ यांचा आर्शिवाद घेत माझे पूर्ण प्रयत्न करेन! आर्शिवाद असाच राहूद्या.” अक्षयच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत शिवाय त्याला चित्रपटासाठी शुभेच्छा देखील देत आहे.

अक्षय व्यतिरिक्त हे कलाकारही चित्रपटात असणार मुख्य भूमिकेत
‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त विराज मडके, तुळजा जामकर, जय दुधाणे, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, सत्यम मांजरेकर आणि प्रवीण तरडे हे कलाकार देखील चित्रपटात मुख्य भूमिका साकारतील. डिसेंबरपासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, वर्ष 2023 मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा :

चाहत्यांची मागणी ऐकून अक्षयला ‘हेरी फेरी 3’मध्ये घेण्यासाठी निर्मात्यांचे प्रयत्न सुरू

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -