घरमनोरंजन'द कश्मीर फाइल्स'ने केली पाचव्या दिवशी १८ करोडोंची कमाई ; ‘गंगूबाई काठियावाड़ी’ला...

‘द कश्मीर फाइल्स’ने केली पाचव्या दिवशी १८ करोडोंची कमाई ; ‘गंगूबाई काठियावाड़ी’ला सुद्धा टाकलं मागे

Subscribe

या चित्रपटामध्ये 1990 च्या काळातील काश्मिरी पंडितांचा संघर्ष दाखवला असून 30 वर्षांपासून लपून असलेल्या काश्मिरी पंडितांची गोष्ट या चित्रपटाद्वारे जगासमोर मांडली आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने सध्या संपूर्ण भारतभर धूमाकुळ घातलेला आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत असून, ‘द कश्मीर फाइल्स’ने नवा इतिहास रचायला सुरुवात केली आहे. या चित्रपटात दाखवलेली सत्य घटना जाणून घेण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. 11 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाने आतापर्यंत करोडोंचा टप्पा पार केला आहे.

खरंतर हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा सर्वदूर पसरली होती. आता हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी 3.35 करोडची कमाई केली होती. शनिवारी 8.50 करोड, रविवारी 15.10 करोड, सोमवारी 15.05 करोड, मंगळवारी 18 करोड एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 60.20 करोडोंची कमाई केली आहे. याबाबत सांगताना विवेक अग्निहोत्रींनी या चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई सोशल मिडिया अकाउंटवर शेअर केली आहे.

- Advertisement -

‘द कश्मीर फाइल्स’ने ‘गंगूबाई काठियावाड़ी’ला टाकलं मागे

द कश्मीर फाइल्सने इतर हिंदी चित्रपटांना मागे टाकायला सुरुवात केलेली आहे. तरुण आदर्शने शेअर केलेल्या माहितीनुसार, ‘द कश्मीर फाइल्स’ने पहिल्या क्रमांकावर बाजी मारलेली आहे. जिथे द कश्मीर फाइल्स 18 करोडोंबरोबर टॉपवर आहे, तिथे 11.22 करोडोंसोबत अक्षय कुमारचा चित्रपट ‘सूर्यवंशी’ दुसऱ्या स्थानी आहे. आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाड़ी’ तिसऱ्या क्रमांकावर असून, चौथ्या स्थानी 6.70 करोडोंसोबत रणवीर सिंगचा ‘83’ चित्रपट आहे.

- Advertisement -

या चित्रपटामध्ये 1990 च्या काळातील काश्मिरी पंडितांचा संघर्ष दाखवला असून 30 वर्षांपासून लपून असलेल्या काश्मिरी पंडितांची गोष्ट या चित्रपटाद्वारे जगासमोर मांडली आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात काश्मिरी पंडितांचे दुःख आणि संघर्षाची गोष्ट दाखवली आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ चे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले असून, या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर हे कलाकर मुख्य भूमिकांमध्ये आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -