घरमनोरंजनFlickr : प्रेमाचा खरा अनुभव देण्यासाठी लवकरच ‘फ्लिकर’ चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Flickr : प्रेमाचा खरा अनुभव देण्यासाठी लवकरच ‘फ्लिकर’ चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

कोणत्याही चित्रपटाचे कथा आणि त्याचं तेवढंच आकर्षक शीर्षक अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच चित्रपटाचे अनोखे शीर्षक हे मराठीसृष्टीमध्ये ओळखली जाते. लवकरच ‘फ्लिकर’ (Flickr) हा अगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कोणत्याही चित्रपटाचे कथा आणि त्याचं तेवढंच आकर्षक शीर्षक अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच चित्रपटाचे अनोखे शीर्षक हे मराठी चित्रपटसृष्टीत त्याची वेगळी ओळख निर्माण करतात. लवकरच ‘फ्लिकर’ (Flickr) हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हटके टायटल आणि प्रेमाचा हळूवार अनुबंध उलगडून दाखविणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती मणिगंडन मंजुनाथन (Manigandan Manjunathan) प्रस्तुत आणि ‘राजसरकार फिल्म्स’(‘Rajsarkar Films’) व ‘पोस्टमन फिल्म्स’ (Postman Films) यांनी केली आहे. यामध्ये प्रेमाचा खरा अर्थ दाखवला जाणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी नुसरत शानुर मुजावर, मणिगंडन मंजुनाथन, प्रेमराणी मंजुनाथन यांनी चांगली सांभाळली आणि राहुल पाटील (Rahul Patil) यांनी या चित्रपटात सहनिर्मिती केली, तर अमोल पाडावे यांनी याचे लेखन केले आहे.

प्रेम ही अशी एक भावना आहे, जी आयुष्यात प्रत्येक जण कोणाच्या ना कोणाच्या तरी प्रेमात पडल्यावर समजते. अशक्य असलेले शक्य करून दाखवते. म्हणून म्हणतात ना ‘ये इश्क नही आसान’. हे दाखवून देणारा सत्यघटनेवर आधारित ‘फ्लिकर’ हा चित्रपट प्रेमाचा खरा अनुभव प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याचा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

राजवीर सरकार (Rajveer Sarkar) आणि तन्वी किशोर (Tanvi Kishor) ही नवी जोडी ‘फ्लिकर’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका हे कलाकार सयाजी शिंदे, संजय मोने, समीर चौघुले, शुभांगी लाटकर, पूजा पवार, अरुण कदम, गौरव रोकडे, मनीषा केळकर, मौसमी तोंडवळकर, पूर्णिमा अहिरे, सायली जाधव, प्रतीक्षा शिर्के, किशोर नांदलस्कर साकारणार आहेत.

‘फ्लिकर’ या चित्रपटाची पटकथा आणि संवाद (Screenplay and dialogue) जय अत्रे, मंदार चोळकर, अमोल पाडावे, समीर सामंत यांनी लिहिले आहे. या चित्रपटासाठी संगीत (Music) मंगेश कांगणे यांनी लिहिलं आहे. हिंदीतील बेनी दयाल, मोहम्मद इरफान या गायकांनी स्वरसाज दिला. ‘फ्लिकर’ या चित्रपटाला छायांकन (Cinematography) उदयसिंग मोहिते यांनी दिले आणि संकलन आशिष म्हात्रे यांनी केले आहे. ‘फ्लिकर’ हा चित्रपट महेश पावसकर असोसिएट दिग्दर्शक आहेत. संदीप काळे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी यांच्याकडे होती. कला दिग्दर्शक (Art director) हे प्रशांत राणे आहेत. तर निर्मिती प्रबंधक गुनाशेखरन तंघवेल आहेत. तसेच ‘फ्लिकर’ची प्रेमकहाणी प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -