संगीताचा वारसा असणाऱ्या शिंदेशाही परिवाराचे नाव आता वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीतही समाविष्ट

वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीतर्फे शिंदे कुटुंबाला 'मोस्ट रेकॉरडेड आर्टिस्ट इन फॅमिली' हे नामांकन प्राप्त झाले

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या सुरेल स्वरांनी बांधून ठेवणाऱ्या शिंदे कुटुंबाचे सध्या फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात चाहते निर्माण झाले आहेत. लोकसंगीताचा वारला लाभलेल्या शिंदे कुटुंबाने भक्तीगीते, कोळीगीत, भीम गीत, कव्वाली , लोकगीत तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील जबरदस्त गाण्यांमधील गाणी गायली आहेत. प्रल्हाद शिंदे यांची लोकसंगीत आणि भक्तीगाताचा वारसा आजही त्यांची नवी पिढी पुढे घेऊन जात आहे. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे आणि त्यांची पुढची लोकसंगीताचा वारसा चालवत आहे. त्यातंच एक अभिमानाची गोष्ट म्हणजे नुकतेच शिंदे कुटुंबाचे नाव वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत समाविष्ट झाले आहे. यासंबंधात एक खास पोस्ट उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

भगवान शिंदे म्हणजेच आनंद शिंदे यांचे आजोबा उत्तम पेटीवादक होते. तसेच त्यांची आजी सोनाबाई तबलावादक होत्या. त्यामुळे त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीतर्फे शिंदे कुटुंबाला ‘मोस्ट रेकॉरडेड आर्टिस्ट इन फॅमिली’ हे नामांकन प्राप्त झाले.

 या संदर्भात माहिती देताना उत्कर्ष शिंदेने याबाबत एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. ज्यात त्याने लिहिलंय की, “23जून 2022 काल माझे आजोबा स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे ह्यांची 18वि पुण्यतिथी .आणि कालच जागतिक दर्जा चे वर्ल्ड रेकॉर्ड कोम्मुनिटी तर्फे शिंदेशाही परिवाराचे नाव वर्ल्ड रेकॉर्ड कोम्मुनिटी च्या यादीत विराज मान झाले .कालच्या दिनी हि सर्वात मोठी आदरांजली मी मानतो .शिंदेशाही परिवाराला हे मिळालेले यश हे फक्त तुम्हा रसिकजना मुळे ,आमच्या सोबत काम करणाऱ्या एकूण एक कलाकारा मुळे ,आमच्या वर नितांत प्रेम करणाऱ्या सर्वांचे आहे असे आम्ही मानतो .आम्हाला मिळालेले हे वर्ल्ड रेकॉर्ड कोम्मुनिटी चा मान सन्मान मी सर्व महापुरुषांच्या चरणी सादर करतो .आपण होतात आपण लढलात म्हणून आम्ही घडलो“. असं त्याने पोस्टमध्ये लिहिलेलं आहे.

खरंतर शिंदे परिवारातील जवळपास चार पिढ्यांनी संगीत क्षेत्रात आपले स्थान मिळवले आहे. भगवान शिंदे यांच्यापासून या संगीत सेवेला सुरूवात झाली. त्यांच्यानंतर त्यांची सदाशिव, नारायण आणि प्रल्हाद या तीन मुलांनी देखील गायन क्षेत्रात आपले नाव कमावले. प्रल्हाद शिंदेची भक्तीगीतं आजही खूप लोकप्रिय आहेत. प्रल्हाज शिंदेंनंतर त्यांचा मुलगा आनंद शिंदे नातू आर्दश शिंदे यांनीही संगीत क्षेत्राची भरभरून सेवा केली. अश्या या संगीताचा वारसा असणाऱ्या शिंदेशाही कुटुंबाचे नाव आता वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत समाविष्ट झाले आहे.


हेही वाचा :किच्चा सुदीपच्या बहुप्रतिक्षित ‘विक्रांत रोना’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज