किच्चा सुदीपच्या बहुप्रतिक्षित ‘विक्रांत रोना’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अनूप भंडारी दिग्दर्शित 'विक्रांत रोना' 28 जुलै रोजी जगभरात 3डी मध्ये प्रदर्शित होणार आहे, ज्यात किचा सुदीप मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, निरुप भंडारी आणि नीता अशोक यांच्याही भूमिका आहेत

किच्चा सुदीपच्या 3डी मिस्ट्री थ्रिलर विक्रांत रोनाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून तो अपेक्षेपेक्षा भव्य दिव्य झाला आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्या गेलेल्या किच्चा सुदीपच्या ग्रँड एंट्रीपासून त्याच्या अप्रतिम व्हिज्युअल इफेक्ट्सपर्यंत सर्वच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहेत.

एक वेधक संकल्पना आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या 3डी व्हिज्युअल्ससह, हा ट्रेलर नेत्रदीपक पद्धतीने गावातील दृश्याची झलक पडद्यावर चित्रित करतो. तसेच, किच्चा सुदीपची जहाजावरील एन्ट्री खरोखरच भव्य आणि थक्क करणारी असून ग्लॅमरस जॅकलीन फर्नांडिस तिच्या हॉट अवताराने वेड लावते. मुंबईत या चित्रपटाच्या ट्रेलरचे खास अनावरण करण्यात आले असून तिथे उपस्थित पत्रकारांना ‘रा रा रक्कम्मा’ या खास गाण्याचा आस्वाद घेता आला. ट्रेलर प्रेक्षकांसाठी एक परफेक्ट ट्रीट आहे.

शिवाय, ‘विक्रांत रोना’ हा चित्रपट आणखी एका कारणाने प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा आहे, कारण विविध इंडस्ट्रीतील मोठी नावे वेगवेगळ्या भाषांमध्ये लॉन्च करण्यासाठी एकत्र आली आहेत. सलमान खान हा चित्रपट हिंदीत लाँच करेल, धनुष तामिळमध्ये, दिलकर सलमान मल्याळममध्ये, रामचरण तेलगूमध्ये आणि किचा सुदीप कन्नडमध्ये लॉन्च करेल.

अनूप भडारी दिग्दर्शित ‘विक्रांत रोना’ 28 जुलै रोजी जगभरात 3डी मध्ये प्रदर्शित होणार आहे, ज्यात किचा सुदीप मुख्य भूमिकेत आहे. यासोबतच या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, निरुप भंडारी आणि नीता अशोक यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट उत्तर भारतात सलमान खान फिल्म्स, झी स्टुडिओ आणि किच्छा क्रिएशन्सने सादर केला आहे. या चित्रपटाची सहनिर्मिती जॅक मंजुनाथ यांनी त्यांच्या शालिनी आर्ट्सच्या निर्मिती अंतर्गत केली आहे आणि इन्व्हेनिओ ओरिजिन्सचे अलंकार पांडियन यांच्यासोबत आहे. पीव्हीआर पिक्चर्सद्वारे हा चित्रपट उत्तर भारतात वितरित केला जाणार आहे.