राज ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज, लीलावती रुग्णालयात सुरु होते उपचार

राज ठाकरेंच्या पायावरची म्हणजेच हिप बोन शस्त्रक्रिया करण्यात आली. २० जून रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. या सल्ल्यानुसार ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज ठाकरेंवर हिप-बोन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राज ठाकरेंवर पाच दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेच्या नंतर राज ठाकरे रुग्णालयातच उपचार घेत होते. अखेर त्यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज ठाकरेंनी रुग्णालयातून घरी परतल्यावर पत्रक जारी करत राज्यातील मनसैनिकांचे आभार मानत घरी आल्याची माहिती दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे रुग्णालयातून घरी परतल्याची माहिती मनसे अधिकृत या ट्विटर अकाऊंटवर पत्रक पोस्ट करुन दिली आहे. राज ठाकरेंच्या पायावरची म्हणजेच हिप बोन शस्त्रक्रिया करण्यात आली. २० जून रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. या सल्ल्यानुसार ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय म्हटलयं?

जय महाराष्ट्र! आपल्या आशिर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडली. काही वेळापूर्वीच रुग्णालयामधून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपले आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम असो. असे राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

राज ठाकरेंच्या स्वास्थासाठी मनसैनिकांकडून प्रार्थना

राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली. पण त्याआधी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी देवाकडे साकडं घातलं. मोरया गोसावी गणपती मंदिरात आरती करून प्रार्थना करण्यात आली. तसेच भीमाशंकरमध्ये सुद्धा अभिषेक करण्यात आला.

राज ठाकरेंवर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. परंतु राज ठाकरेंना कोरोनाची लागण झाली होती. तसेच कोविड डेड सेल्स आढळल्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. अखेर २० जून रोजी त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.  डॉ. जलील पारकर आणि त्यांच्या टीमने राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली आहे. राज ठाकरेंना आता डिस्चार्ज देण्यता आला असून ते शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.


हेही वाचा : गुजरात दंगलीला नेहमीच राजकीय नजरेतून पाहिले गेले, मी मोदींचे दु:ख जवळून पाहिले – अमित शाह