घरमनोरंजनशाहिद कपूरच्या 'जर्सी' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली ; काय आहे कारण?

शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली ; काय आहे कारण?

Subscribe

शाहिद कपूच्या ‘जर्सी’ या आगामी चित्रपटाची वाट त्याचे चाहते अनेक दिवसांपासून पाहत आहेत. येत्या १४ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु आता या चित्रपटाची रिलीज पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट प्रदर्शनासाठी पूर्णपणे सज्ज असताना, अचानक झालेल्या बदलामुळे शाहिदचा चाहता वर्ग नाराज झाला आहे. मागील काही दिवसांपूर्वी शाहिद कपूर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्ली येथे गेला होता, त्यावेळी त्याने या चित्रपटाची तारीख सांगितली होती. मात्र, आता अचानक या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.

शाहिद कपूच्या जर्सी चित्रपटाची नवीन रिलीज डेट

- Advertisement -

या चित्रपटाबाबत तरूण आदर्शने ट्वीट केले आहे की, ‘एक्सक्लयूजिव ब्रेकिंग न्यूज..जर्सी या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत आहे. आता या चित्रपट एका आठवड्यानंतर रिलीज केला जाईल. येत्या २२ एप्रिल रोजी सर्व चित्रपटगृहात हा चित्रपट रिलीज होईल.’ १४ एप्रिल रोजी साउथ मधील केजीएफ चॅप्टर २ सुद्धा रिलीज होणार आहे.

- Advertisement -

जर्सी चित्रपटाची रिलीज डेट बदलण्याचे कारण
खरंतर साउथचा चित्रपट केजीएफ हा येत्या १४ एप्रिल रोजी प्रदर्शिक होणार आहे, हा चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू शकतो. कलेक्शनच्या बाबतीतही हा चित्रपट अनेक चित्रपटांना मागे टाकू शकतो. त्यामुळे शाहिद कपूरच्या जर्सी या चित्रपटाची तारीख १४ एप्रिल वरुन २२ एप्रिल करण्यात आली.

मृणाल ठाकूर सोबत येणार दिसून
जर्सी चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्नानुरी यांनी केलं असून हा चित्रपट तेलगू चित्रपटाचा रीमेक आहे. या चित्रपटामध्ये एका हरलेल्या क्रिकेटची गोष्ट सांगण्यात आली आहे. तसेच सध्या सगळीकडे IPL टुर्नामेंट चालू आहे. त्यामुळे ही वेळ हा चित्रपट रिलीज करण्यासाठी उत्तम आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर मुख्य भुमिकेत दिसून येतील.

हेही वाचा :Ranbir-Aliaच्या लग्नापूर्वी अयान मुखर्जीने Brahmastraचा ‘लव्ह पोस्टर’ केला प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -