घरमनोरंजनसिने-महोत्सवांमध्ये २ पुरस्कार पटकावलेला 'अन्य' हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सिने-महोत्सवांमध्ये २ पुरस्कार पटकावलेला ‘अन्य’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

'अन्य' या चित्रपटामध्ये सिम्मी यांनी मानव तस्करी या अतिशय महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

‘अन्य’ हा नवाकोरा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. येत्या १० जून रोजी हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक सिम्मी जोसेफ यांनी केलं असून, त्यांनी पहिल्यांदाच अन्य या चित्रपटातून मराठीत पदार्पण केलं आहे. ‘अन्य’ या चित्रपटामध्ये सिम्मी यांनी मानव तस्करी या अतिशय महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मानव तस्करी ही मानवतेला लागलेली कीड असून, ही कीड प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या समाजाला पोखरणारी आहे. ही कीड जर वेळीच ठेचली नाही, तर समाज अधोगतीला जायला वेळ लागणार नाही. हा विषय प्रभावीपणे मांडण्यासाठी एका डॉक्युमेंट्रीचा आधार घेण्यात आला आहे. अन्य चित्रपटाच्या माध्यमातून डॉक्युमेंट्रीच्या आधारे समाजातील कटू वास्तव आणि भयावह सत्य सादर करण्याचा केलेला आहे.

या चित्रपटात अतुल कुलकर्णी मुख्य भूमिकेत असून प्रथमेश परब, तेजश्री प्रधान, भूषण प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे हे मराठी कलाकार तसेच हिंदी सिनेसृष्टीतील रायमा सेन, यशपाल शर्मा, गोविंद नामदेव हे कलाकारही या चित्रपटात उत्तम भूमिका साकारताना दिसून येतील. तसेच ‘अन्य’ या चित्रपटाने स्वीडनमधील अॅलव्हिसबीन फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट फिल्म, लंडनमधील फॅलकॉन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (जून एडिशन २०२१) मध्ये बेस्ट फर्स्ट टाईम डायरेक्टर आणि बेस्ट पिक्चर असे दोन पुरस्कार पटकावले आहेत. ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि टोरंटो इंडिपेन्डंट फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटानं कौतुकाची थाप मिळाली आहे.

- Advertisement -

दिग्दर्शनासोबतच या चित्रपटाचे लेखन सिम्मी यांनी केलं असून, महेंद्र पाटील यांनी संवादलेखन केलं आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये बनलेल्या या चित्रपटातील हिंदी गीतरचना डॉ. सागर आणि सजीव सारथी यांनी लिहिल्या असून, मराठी गीतरचना प्रशांत जामदार यांनी केल्या आहेत. हिंदी सिनेसृष्टीत समधुर संगीतरचना देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संगीतकार विपीन पटवा यांच्यासह राम नाथ, रिषी एस. आणि कृष्णाराज यांनी ‘अन्य’मधील गीतरचना संगीतबद्ध केल्या आहेत. पार्श्वसंगीत रोहित कुलकर्णी यांचं आहे.


हेही वाचा :Ranbir Alia Wedding: अखेर तो क्षण आला, रणबीर-आलिया घेणार आज सात फेरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -