घरमनोरंजन'अँग्री बर्ड्स २' मध्ये ऐकू येणार 'या' कॉमेडियनचा आवाज

‘अँग्री बर्ड्स २’ मध्ये ऐकू येणार ‘या’ कॉमेडियनचा आवाज

Subscribe

अँग्री बर्ड्स या अॅनिमेटेड चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अँग्री बर्ड्स या प्रसिद्ध अॅनिमेटेड मूव्हीचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अँग्री बर्ड्स मूव्ही- २ असा हा चित्रपट असणार आहे. हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलगु या भारतीय भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटातील मुख्य पात्र रेड साठी भारताचा सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याने आवाज दिला आहे. चित्रपट समिक्षक तरण आदर्श याने आपल्या ट्वीटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी ट्वीटर अकाउंटवर अँग्री बर्ड्स मूव्ही- २ मधील रेड आणि सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यांचे छायाचित्र ट्वीट केले आहे. तसेच या छायाचित्रासोबतच त्यांनी एक पोस्टसुद्धा लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, अँग्री बर्ड्स मूव्ही- २ मधील मुख्य पात्र रेड साठी कॉमेडियन कपिल शर्माने आवाज दिला आहे. २३ ऑगस्ट रोजी हा अँग्री बर्ड्स मूव्ही- २ हा अॅनिमेटेड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. द कपिल शर्मा शोमधून कॉमेडियन कपिल शर्माला खूप प्रसिद्धी मिळाली. बॉलिवूडमध्येही त्याला या प्रसिद्धीच्या जोरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अँग्री बर्ड्स या अॅनिमेटेड चित्रपटाचा अँग्री बर्ड्स मूव्ही- २ हा सिक्वेल आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -