घरमनोरंजन...म्हणून दिला होता विद्याने जयललितांच्या बायोपिकला नकार

…म्हणून दिला होता विद्याने जयललितांच्या बायोपिकला नकार

Subscribe

तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळातील एक मोठे नाव म्हणजेच जयललिता यांच्या जीवनावर चित्रपट येत आहे. या चित्रपटामध्ये जयललिता यांची भूमिका साकारण्यासाठी विद्या बालन हिने नकार दिला होता आणि कंगना राणौत हिची त्या भूमिकेसाठी वर्णी लागली. मात्र, विद्याने नेमका का नकार दिला होता, हे आता समोर आले आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड सुरू झाला आहे. राजकारणी नेत्यांच्या आयुष्यावर चित्रपट येऊ लागले आहेत. वर्षाच्या सुरूवातीलाच दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट आला. तर डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर ही ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे. तसेच आता तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळातील एक मोठे नाव जयललिता यांच्या जीवनावर बायोपिक येणार आहेत. जयललिता यांची भूमिका साकारण्यामध्ये बॉलिवूड क्विन कंगना राणौत हिचे नाव पुढे आले आहे. मात्र, कंगनाच्या अगोदर विद्या बालन हिचे नाव चर्चेत होते. पण विद्याने जयललिता यांच्या भूमिकेतील चित्रपट करण्यास नकार दिला होता.

का दिला होता नकार?

विद्या बालन हिने जयललिता यांच्या भूमिकेतील चित्रपट करण्यास नकार का दिला होता? हा प्रश्न सगळ्यानाच सतवत होता. मात्र, त्याचे उत्तर मिळाले आहे. विद्याला असे वाटत होते की, ती जयललिता यांच्या भूमिकेला हवा तसा न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे तिने इंदिरा गांधी यांच्या जीवनावर येणाऱ्या वेब सीरीजवर काम करण्याचा निर्णय घेत, विद्या बालनने जयललिता यांच्या बायोपिकला नकार दिला होता. विद्यासाठी ही निर्णय घेणे खूप कठिण होत. मात्र, निर्णय झाल्यानंतर विद्याने अतिशय समंजशपणे बायोपिकला नकार दिला. जयललितांचा बायोपिकचे एएल विजय दिग्दर्शन करीत आहेत. लवकरच कंगणा बायोपिकच्या कामाला सुरूवात करणार आहे. या बायोपिक करण्यासाठी कंगनाने २४ करोड रूपये घेतले आहे. मात्र, निर्मात्यांकडून कंगनाच्या फिसचा खुलासा केला नाही आहे.

- Advertisement -

माझे आणि जयललितांचे जीनव एकसारखे

कंगना राणौतने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, जयललिता आणि माझे जीवन काहीसे एकसारखी आहे. तर कंगना तिच्या स्वत:च्या जीवनावर आधारित बायोपिकवर काम करणार होती. मात्र, माझी आणि जयललिता यांची जीवन कथा मिळती जुळती असल्याने या बायोपिकमध्ये काम करण्यास खुश असल्याचे ती म्हणाली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -