घरताज्या घडामोडीतिकीट दे रे बाबा! Spider No way Homeच्या तिकीटसाठी शिल्पाचा स्पॉयडरमॅनच्या पुढ्यात...

तिकीट दे रे बाबा! Spider No way Homeच्या तिकीटसाठी शिल्पाचा स्पॉयडरमॅनच्या पुढ्यात नाच

Subscribe

‘स्पाय़डर मॅन नो वे होम’ (Spider No way Home)  हा सिनेमा रिलीज झाला आहे. प्रेक्षकांमध्ये सिनेमाची प्रचंड क्रेझ पहायला मिळत आहे. सिनेमाचे एक तिकीट चक्क बावीसशे रुपयांना विकले गेले आहे. जवळपास दीड लाख लोकांनी सिनेमाचे आगाऊ बुकींग केले होते. बॉलिवूड सेलिब्रेटी देखील स्पायडरमॅनसाठी क्रेझी आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीला देखील स्पायडरमॅनची चाहती आहे. सिनेमा पाहण्यासाठी शिल्पाला देखील तिकीट मिळाले नाही म्हणून शिल्पाने थेट स्पायडरमॅनच्या पुढ्यात नाच केलाय. शिल्पाने तिच्या सोशल मीडियावर स्पायडरमॅनकडे सिनेमाचे तिकीट मागत असतानाचा व्हिडिओ पोस्ट केलाय. ज्यात शिल्पाची सिनेमाचे तिकीट मिळवण्यासाठी झालेली अवस्थापाहून नेटकऱ्यांना हसू आवरलेलं नाही.

- Advertisement -

शिल्पाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शिल्पाला स्टायडरमॅन नो वे होम सिनेमाचे तिकीट न मिळाल्याने ती वैतागून तिच्या खोलीत येते. खोलीत स्पायडर मॅन बसलेला असतो. शिल्पा स्पायडरमॅनकडेच सिनेमाच्या तिकीटसाठी रिक्वेस्ट करते. पण स्पायडरमॅन काही शिल्पाला तिकीट देत नाही. तिकीट मिळवण्यासाठी शिल्पा स्पायडरमॅनला डान्स शिकवते. दोघेही डान्स करतात पण स्पायडरमॅन काही शिल्पाला तिकीट देत नाही. स्पायडरला रिक्वेस्ट करुनही तिकिट न मिळाल्याने शेवटी निराश झालेल्या शिल्पाचा चेहरा पाहण्यासारखा आहे.

स्पायडरमॅन वो वे होम हा मार्वेल सिनेमॅटिक युनिवर्सचा २७वा सिनेमा आहे. १६ डिसेंबरला सिनेमा भारतात रिलीज झालाय. तर १७ डिसेंबरला हॉलिवूड आणि अमेरिकेसह जगभरात सिनेमा रिलीज होणार आहे. स्पायडरमॅन वो वे होम हा सिनेमा ‘स्पायडरमॅन: होमकमिंग’ आणि ‘स्पायडरमॅन: फार फ्रॉम होम’ या सीरीजमधील तिसरा सिनेमा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Spider Man No Way Home: प्रेक्षकांची क्रेझ पाहून थिएटर्सनी बदलली शोची वेळ, तिकिटाची किंमत तर पहा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -