घरताज्या घडामोडीनेहा पेंडसेच्या नवऱ्याचा याआधी दोनदा झालाय घटस्फोट!

नेहा पेंडसेच्या नवऱ्याचा याआधी दोनदा झालाय घटस्फोट!

Subscribe

अभिनेत्री नेहा पेंडसे ही दोन दिवसांपूर्वी व्यासायिक शार्दुल सिंग याच्यासोबत विवाह बंधनात अडकली. पुण्यात पारंपारिक पद्धतीने मोठ्या थाटात विवाह सोहळा पार पडला. दोन दिवसांपासून नेहाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहाने लग्नानंतर स्पॉटबॉय या संकेत स्थळाशी बातचित केली. त्यावेळी ती शार्दुलच्या वैयक्तिक जीवनाविषयी देखील बोलली.

- Advertisement -

नेहा बोलली की, ‘ती शार्दुलच्या अगोदर दोन-तीन रिलेशनशिप मध्ये होती. पण ते रिलेशनशिप सफल झाले नाही. या असफलतेमुळे ती अजून धीट झाली.’ तसंच अगदी कमी लोकांना माहित आहे की, नेहा ही शार्दुलची तिसरी पत्नी आहे. या अगोदर शार्दुलचे दोनदा लग्न झाले असून दोन्ही पत्नीपासून शार्दुला दोन मुली आहेत. शार्दुलचे दोन वेळा तलाक झाला आहे.

- Advertisement -

याबाबत जेव्हा नेहाला प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली, ‘शार्दुला दोन सुंदर मुली आहेत हे मला माहित आहे. त्याचे दोनदा लग्न झाले आहे हे देखील मला लग्ना अगोदरच माहित आहे. त्याने माझ्यापासून काहीही लपवलं नाही आहे. शार्दुलचे दोन वेळा लग्न झाले आहे याचा मला फरक पडतं नाही.’

नेहाने अनेक मराठी मालिका, चित्रपट तसंच हिंदी मालिकामध्ये देखील काम केलं आहे. त्यानंतर ती ‘बिग बॉस १२’ मध्ये दिसली होती.


हेही वाचा – ‘बॉलिवूड खान’ना मागे टाकत खिलाडी अभिनेत्याची ७०० कोटींची कमाई


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -