घरताज्या घडामोडीHaseen Dilruba Most Viewed Netflix: 'हसीन दिलरुबा'चा नेटफ्लिक्सवर नवा रेकॉर्ड

Haseen Dilruba Most Viewed Netflix: ‘हसीन दिलरुबा’चा नेटफ्लिक्सवर नवा रेकॉर्ड

Subscribe

अनेक सिनेमा तसेच वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्या मात्र हसीन दिलरुबाचा सिलसीला काही नेटफ्लिक्सवर कमी झाला नाही.

अभिनेत्री तापसी पन्नू आणि विक्रांत मेसी यांच्या हसीन दिलरुबा या सिनेमाने नेटफ्लिक्सवर एक नवा रेकॉर्ड तयार केला आहे. २ जुलै २०२१ ला हसीन दिलरुबा हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. त्यानंतर अनेक सिनेमा तसेच वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्या मात्र हसीन दिलरुबाचा सिलसीला काही नेटफ्लिक्सवर कमी झाला नाही. या सिनेमाने ओटीटी प्लॅटफॉर्मचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. नेटफ्लिकवर आतापर्यंत सर्वाधिक वेळा पाहिल्या गेलेल्या सिनेमांमध्ये हसीन दिलरुबा या सिनेमाचा समावेश आहे.

हसीन दिलरुबा हा सिनेमा तापसी पन्नू,विक्रांत मेसी,हर्षवर्धन राणे यांच्या तगड्या अभिनयाने भरलेला आहे. कनिका ढिल्लो यांनी सिनेमाचे लेखन केलेय तर विलीन मँथ्यू यांनी सिनेमाची निर्मीती केली आहे. सिनेमा जुलै ते डिसेंबर या महिन्यात २४.६३ मिलियन व्ह्यूज मिळवले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक व्ह्यूज मिळवणारा हसीन दिलरुबा हा सिनेमा नंबर एकवर आहे तर सूर्यवंशी नंबर दोन आणि तिसऱ्या नंबरवर मिमी तर चौथ्या नंबर धमाका हा सिनेमा आहे.

- Advertisement -

विलीन मँथ्यू यांनी सिनेमाची निर्माती केली आहे. अपारंपरिक रोमँटिक थ्रीलर मोठ्या पडद्यावर साकार करत एक अनोखी विलक्षण प्रेमकथा सिनेमात दाखवण्यात आली आहे. हा सिनेमा म्हणजे विभिन्न शैलीचे एकत्रित मिश्रण आहे. सिनेमाच्या निर्मात्यांचे यासाठी सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

सिनेमाच्या इतक्या मोठ्या यशाविषयी सांगताना सिनेमाचे निर्माते विनील मँथ्यू यांनी म्हटलेय, एका सिने निर्मात्यासाठी हसीन दिलरुबा एक आव्हानात्मक ड्रामा होता.जो मी फार बारकाईने हाताळली आहे. हा सिनेमा मला आणखी प्रगत विषयावर सिनेमा करण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचे म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – क्या बात हैं! 83नंतर रणवीरला ५ बायोपिक्सची ऑफर

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -