घरमनोरंजन'अब लढ जाना', उरीचे गाणे रिलीज

‘अब लढ जाना’, उरीचे गाणे रिलीज

Subscribe

उरी' हा सिनेमा येत्या ११ जानेवारीला रिलीज होत आहे. नव्या वर्षाचे निमित्त साधत हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. शिवाय प्रजासत्ताक दिनाच्या आधी हा सिनेमा रिलीज होत आहे

विकी कौशल आणि यामी गौतम स्टारर ‘उरी’ या सिनेमाचे गाणे काहीच तासांपूर्वी रिलीज करण्यात आले आहे. ‘अब लढ जाना’ असे या गाण्याचे बोल असून हे गाणे विवेक हरीहरन याने गायलेले आहे. सत्य घटनेवर आधारीत असलेल्या या सिनेमाची खूप आधीपासून चर्चा होती. ट्रेलर आल्यानंतर या सिनेमाची फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सिनेमातील पहिले गाण्याची स्तुती ही सोशल मीडियावर केली जात आहे. पाहा या सिनेमातील गाणे…

पाहा गाणं

- Advertisement -

(सौजन्य- झी टीव्ही)

सत्य घटनेवर आधारीत सिनेमा

२०१६ सालच्या सर्जिकल स्ट्राईकमधील भारतीय लष्कराची शौर्य गाथाा सांगणारा हा सिनेमा आहे. विकी कौशल या आधी देखील राझी सिनेमातून पाकिस्तानच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसला आहे. आणि आता विकी कौशल भारताच्या पोलीस दलात कमांडो आहे. विक्कीचा हा अंदाजही त्याच्या चाहत्यांना भावला आहे. शिवाय यामी गौतम देखील पहिल्यांदाच एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात किर्ती कुलहरी आणि परेश रावल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

- Advertisement -

११ जानेवारीला ‘उरी’ येतोय

‘उरी’ हा सिनेमा येत्या ११ जानेवारीला रिलीज होत आहे. नव्या वर्षाचे निमित्त साधत हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. शिवाय प्रजासत्ताक दिनाच्या आधी हा सिनेमा रिलीज होत आहे. आता राझीनंतर हा सिनेमा प्रेक्षकांना कसा वाटतो हे कळेलच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -