घरमनोरंजन'उरी'च्या टीमने जवानांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन!

‘उरी’च्या टीमने जवानांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन!

Subscribe

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटाच्या टीमने आज जवानांसोबत 'प्रजासत्ताक दिन' साजरा केला आहे. या चित्रपटाच्या टीमने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 'वाघा-अटारी' सीमेला भेट दिली आहे.

सध्या सगळीकडे ‘ठाकरे’ चित्रपटाबरोबर आणखी एका हिट चित्रपटाची चर्चा आहे. तो म्हणजे ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’. नवीन वर्षातील सुपरहीट चित्रपटांच्या यादीत उरी पहिल्या क्रमांकावर आहे. अभिनेता विकी कौशल या चित्रपटात मुख्य भुमिकेत आहे. सर्जिकल स्ट्राईकवर आधारीत असलेल्या या चित्रपटाच्या टीमने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘वाघा-अटारी’ सीमेला भेट दिली आहे. सीमेवरील जवानांसोबत चित्रपटाची टीमने ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला आहे.

वाघा बॉर्डरवर शानदार सोहळा

दरवर्षी स्वातंत्रदिनी आणि प्रजासत्ताक दिनी वाघा बॉर्डरवर शानदार सोहळ्याचे आयोजन केलं जातं. ‘बिटिंग द रिट्रीट’ हा सोहळा पाहण्यासाठी देशातील अनेक लोक गर्दी करतात. यावर्षी देशातील लोकांमध्ये ‘उरी’च्या टीमचाही समावेश होता. सीमेवरील जवानांसोबत विकी कौशल, यामी गौतम आणि उर्वरीत संपूर्ण टीमने यावर्षी हा दिवस साजरा केला.

- Advertisement -


हेही वाचा –प्रेक्षकांचा ‘उरी’ला तुफान प्रतिसाद, विकी झाला भावूक

सत्यघटनेवर आधारीत ‘उरी’

जम्मू-काश्मीरमधील ‘उरी’ इथल्या लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला दणका दिला. या सत्यघटनेवर आधारीत ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणावर गल्ला जमवला आहे. विकी कौशलच्या चित्रपटातील कामाचे सर्वत्र कौतूकही होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -