घरमनोरंजनकुली नं. १, त्या सीनमुळे सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस

कुली नं. १, त्या सीनमुळे सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस

Subscribe

वरूण आणि सारा कडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. सिनेमात दाखवण्यात आलेल्या एका सीनमुळे नेटकऱ्यांनी वरूण धवलला चांगलेच ट्रोल केले आहे. त्या सीन वर नेटकऱ्यांनी मीम्स पाऊस पाडला आहे. सध्या हे मीम्स सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहेत.

वरूण धवनचा मोस्ट अवटेड सिनेमा कुली नंबर १ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अमेझॉन प्राइम व्हिडिओ वर हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. प्रेक्षकांना या सिनेमाकडून खूप अपेक्षा होत्या. बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची वाट पाहत होते. मात्र सिनेमा प्रदर्शित होताच सोशल मीडियावर अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान चांगलेच ट्रोल होताना पहायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या १९९५ साली आलेल्या सिनेमाचा हा रिमेक आहे. वरूण आणि सारा कडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. सिनेमात दाखवण्यात आलेल्या एका सीनमुळे नेटकऱ्यांनी वरूण धवनला चांगलेच ट्रोल केले आहे. त्या सीन वर नेटकऱ्यांनी मीम्स पाऊस पाडला आहे. सध्या हे मीम्स सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहेत.

- Advertisement -
काय आहे सीन?

कुली नंबर १ या सिनेमात एका रेल्वे स्थानकाच्या रूळांवर एक लहान दिव्यांग मुलगा बसला असतो. त्या मार्गावर जलद एक्सप्रेस येते. त्या मुलाला वाचविण्यासाठी अभिनेता वरूण धवन एक्सप्रेवर उडी मारतो. वरूण धवन एक्सप्रेसच्या वेगापेक्षाही जलद पळताना दाखवला आहे. एवढेच नाही तर तो एक्सप्रेसवरून उडी मारून एक्सप्रेसच्या इंजिनसमोर खेळत बसलेल्या मुलाला वाचवतो. मुलाला वाचवल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जाते.

- Advertisement -

सिनेमातील हा सीन सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या सीनवरून अभिनेता वरूण धवनला चांगलेच ट्रोल केले आहे. या सीनवर तयार झालेले मीम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ‘अरे हा तर बॉलिवूडमधला स्पायडरमॅन’ असे नेटकरी म्हणत आहेत. हे मीम्स वाचून सगळ्यांनाच हसू येत आहे. या सीनमुळे सिनेमाप्रती प्रेक्षकांच्या असलेल्या सगळ्या अपेक्षा भंग झाल्या आहेत.

१९९५ साली गोविंदा आणि करिश्मा कपूरचा कुली नंबर १ हा सिनेमा आला होता. या सिनेमाचा रिमेक अभिनेता वरूण धवन याने केला आहे. वरूण धवल ने या सिनेमात राजू नावाच्या हमालाची भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांनी मात्र पहिल्या कुली नंबर १ ची जागा कोणीही घेऊ शकत नाही अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. IMDbवर सिनेमाचे १.३ इतके रेटिंग मिळाले आहे.


हेही वाचा – ‘बेफाम’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -