दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा बॉलिवूड विश्वात लवकरच पदार्पण करणार असल्याची घोषणा करण्यात आली. या हिंदी चित्रपटाविषयी बर्याच दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सुपरस्टार विजय देवराकोंडाचा बहुप्रतिक्षीत लायगर या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोमवारी प्रदर्शित करण्यात आला. विजय देवरकोंडाच्या या लूकवर त्याचे चाहते फिदा झाले असून चाहत्यांनी असे काही केले की सगळेच थक्क झाले आहे. सैराट झालेल्या चाहत्यांनी लायगर चित्रपटाची घोषणा होताच सेलिब्रेशन सुरू केले. यावेळी चाहत्यांनी फटाके फोडले, काहींनी केक कापला, काहींनी या विजयच्या या चित्रपटाच्या नावाचा टॅटूही काढल्याचे दिसले. यापैकी काही चाहत्यांनी कहरच केला अणि विजय देवरकोंडा असलेल्या ‘लायगर’च्या पोस्टरला दारूने आंघोळ घातली. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल धुमाकूळ घालत आहे.
बघा व्हिडिओ
Don't waste water
Don't waste MilkBut you can waste Beerss
Beer Abhishekam for our #Liger @TheDeverakonda #VijayDeverakonda@Charmmeofficial @PuriConnects@TeamDeverakonda pic.twitter.com/gtQfDkAe9J
— Saala Crossbreed (@Rowdyfan_Dinesh) January 18, 2021
अर्जुन रेड्डी, गीता गोविंदम, टॅक्सीवाला सारखे अनेक सुपरहिट चित्रपट विजय देवरकोंडाने दिले. तो टॉलिवूडचा मेगास्टार असून त्याचे असंख्य चाहते आहेत. ‘Liger: साला क्रॉसब्रीड’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
View this post on Instagram
ही अॅक्शन फिल्म असून LIGER हा शब्द LION & TIGER या दोन शब्दांनी बनलेला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे प्रमोशन #SAALALACROSSBREED सह केले जात आहे. दरम्यान, करण जोहर आणि त्याची संपूर्ण टीम सध्या या अगामी चित्रपटाच्या कामात गुंतलेली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ हे करणार असून चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
Presenting LIGER, starring the ruler of big screens & hearts – Vijay Deverakonda & the fiery Ananya Panday. Directed by the exceptionally skilled Puri Jagannadh, we can't wait to let the world witness this story in 5 languages – Hindi, Telugu, Tamil, Kannada & Malayalam. #Liger pic.twitter.com/6hOBAB2wgJ
— Karan Johar (@karanjohar) January 18, 2021
असा आहे फर्स्ट लूक
या आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक करण जोहरने नुकताच शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये विजय देवराकोंडा एका फायटरच्या भूमिकेत दिसत आहे. सध्या या लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. सोशल मीडियावर विजयचा हा फर्स्ट लूक येताच त्याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते.