घररायगडरोह्यात राष्ट्रवादी-शेकापला पारंपारिक ग्रामपंचायतींमध्ये धक्का; सेना-भाजपची एन्ट्री

रोह्यात राष्ट्रवादी-शेकापला पारंपारिक ग्रामपंचायतींमध्ये धक्का; सेना-भाजपची एन्ट्री

Subscribe

रोहा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल सोमवारी लागला. यामध्ये रोह्यातील पारंपारिक ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी-शेकापला धक्का बसला आहे. रोह्यामध्ये शिवसेना आणि भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या रोठ बुद्रुकमध्ये शिवसेना-भाजप युतीने ग्रामपंचायत काबिज केली आहे. तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या वाशी ग्रामपंचायत निवडणुकीत सुरेश मगर गटाने राष्ट्रवादीला सर्व नऊ जागांवर दणदणीत पराभव केला आहे.

राष्ट्रवादीने १२ ग्रामपंचायतींवर सत्ता राखून रोहा तालुक्यावर वर्चस्व कायम ठेवलं आहे. मात्र, शिवसेना आणि भाजप युतीने राष्ट्रवादीला धक्का देत सहा ग्रामपंचायतींवर सत्ता काबिज केली आहे. शेकापला दोन तर वाशी ग्रामपंचायत अपक्ष सुरेश मगर गटाकडे गेली आहे. तर रोठ बुद्रुकमध्ये भाजप युवक जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने दिनेश मोरेंचा पराभव केला. शिवसेनेने विधानसभेनंतर शेकापला अलिबाग मतदार संघातील ग्रामपंचायतींमध्ये धक्का दिला आहे. अलिबाग मतदारसंघातील शेणवई, शेडसई, वावे पोटगे ग्रामपंचायतींवर शिवसेनेने विजय संपादन केला.

- Advertisement -

धामणसई, मालसईत राष्ट्रवादी सेना आघाडी झाली होती. मात्र, या आघाडीत बिघाडी झाली आणि याचा फटका सेनेला बसला. दोन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने दमदार वर्चस्व राखलं. तळाघर, घोसाळे, वरसेत राष्ट्रवादीने विजय मिळविला. शिवाय, नागोठणेतील पळसमध्ये राष्ट्रवादीचे शिवराम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा वर्चस्व राखलं. ऐनघर ग्रामपंचायतीत शिवसेनेला तब्बल १४ जागा मिळाल्याने सेशिवसेनेची ताकद वाढली आहे. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या वाशीत राष्ट्रवादीची प्रतिष्ठा धुळीला मिळाली, तर काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश मगर हे मास लीडर ठरले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -