घरमनोरंजनVivek Agnihotri 'द कश्मीर फाईल'नंतर 'हे' दाम्पत्य करणार सत्यघटनांवर दोन नवे...

Vivek Agnihotri ‘द कश्मीर फाईल’नंतर ‘हे’ दाम्पत्य करणार सत्यघटनांवर दोन नवे चित्रपट

Subscribe

विवेक अग्निहोत्री यांनी सांगितले की, 'द कश्मीर फाइल्स' टीम पुन्हा एकत्र काम करणार आहे. तसेच यावेळी आम्ही दोन प्रोजेक्टवर काम करणार आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर देशातील सत्यकथांवर अजून दोन चित्रपटांची निर्मिती करणार असल्याची घोषणा दिग्दर्शक आणि निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी  केली आहे. त्यांनी या चित्रपटांची घोषणा द कश्मीर फाइल्सचे प्रोड्यूसर अभिषेक अग्रवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केली आहे.

दोन प्रोजेक्टसाठी द कश्मीर फाइल्स टीम पुन्हा एकत्र
इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी  सांगितले की, ‘द कश्मीर फाइल्स’ टीम पुन्हा एकत्र काम करणार आहे. तसेच यावेळी आम्ही दोन प्रोजेक्टवर काम करणार आहोत.  मात्र, त्यांनी या चित्रपटांचे कोणतेही टाइटल अद्याप सांगितले नाही. परंतु हे दोन चित्रपट भारताच्या सत्य घटनेवर आधारित असतील.

- Advertisement -

हा व्हिडिओ शेअर करत अभिषेक अग्रवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  ते म्हणाले की, प्रोड्यूसर अभिषेक अग्रवाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, या खास क्षणाच्या निमित्ताने अग्रवाल आर्ट्स आणि आई एम बुद्धा यांच्यातल्या एका नवीन सहयोगाची मला ही घोषणा करताना आनंद होतोय.

- Advertisement -

ओहियो स्टेटने केलं कौतुक

अमेरिकेतील ओहियो स्टेट सीनेटर ने सुद्धा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचं कौतुक केले होते.

सत्य घटनेवर आधारित चित्रपट
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाइल्स हा चित्रपट १९९० मध्ये कश्मीरी पंडितांवर झालेला अत्याचार आणि पलायनावर आधारित आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट झाला आहे .या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार हे कलाकार मुख्य भुमिकेत दिसून आले.

 

 

हेही वाचा :Lock Up Show :’लॉक अप’ शो मध्ये कलाकारांनी शेअर केले सिक्रेट् लाईफ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -