घरमनोरंजनमालिकेच्या सेटवर रंगली वडापाव पार्टी

मालिकेच्या सेटवर रंगली वडापाव पार्टी

Subscribe

‘लेक माझी लाडकी’ या मालिकेच्या सेटवर वडापावची मेजवानी झाली. मस्त रिमझिम पाऊस आणि गरमागरम वडापाव असा बेत जमून आला.

मालिका म्हणजे एक कुटुंब असतं. कोणत्याही कुटुंबात जितक्या गंमतीजमती होतात, तशाच त्या मालिकांच्या सेटवरही होतात. नुकतीच ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेच्या सेटवर वडापावची मेजवानी झाली. मस्त रिमझिम पाऊस आणि गरमागरम वडापाव असा बेत जमून आला.अभिनेता अविनाश नारकर यांनी पुढाकार घेऊन ही वडापाव पार्टी जमवून आणली. ऐश्वर्या नारकर यांनी वडे करण्यासाठी मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश नारकर यांच्यासह आशुतोष कुलकर्णी, सायली देवधर, विकास पाटील यांनीही हातभार लावला. त्यामुळे मालिकेच्या सेटवरच्या सगळ्यांनाच गरमागरम वडापावचा आस्वाद घेता आला.

‘छान पाऊस पडत असताना वडापाव खाण्याची इच्छा झाली. विकत आणण्यापेक्षा आपणच सेटवर करू म्हणून वडे करण्याचा घाट घातला. बाकी सगळ्यांनीही ही कल्पना उचलून धरली आणि उत्साहाने मदतही केली. या वडापाव पार्टीमुळे सेटवर सगळेच खूश झाले.
– अविनाश नारकर, अभिनेते

- Advertisement -

असा आहे राणादाचा फिटनेस फंडा

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका सगळ्या प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. यातील राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि पाठकबाई सगळ्यांचेच लाडके आहेत. या मालिकेने नुकताच ५०० भागांचा टप्पा पार केला.
ऑनस्क्रीन भोळा, रांगडा दिसणारा पेहलवान राणादाबद्दल प्रेक्षकांना कुतूहल आहे. राणादा ऑफस्क्रीन कसा आहे. राणादाचे फिटनेस फंडा काय आहे? तो डाएट कसं करतो? हे जाणून घ्यायला प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या प्रेक्षकांसाठी राणादाने आपला फिटनेस फंडा शेअर केला आहे.

marathi actor hardik joshi
हार्दिक जोशी

राणादा म्हणाला, ‘‘मी शूटिंग संपल्यानंतर नियमितपणे जिमला जातो. जिमला जाणं मी कधीच टाळत नाही तसेच वर्कआऊट करताना मी एकाच अवयवावर लक्ष केंद्रित न करता संपूर्ण शरीराचा व्यायाम करतो. चपळपणासाठी मी योगा देखील करतो, त्यामुळे शरीराला स्टिफनेस येत नाही. तसेच तालमीचे सिन शूट करताना सूर्यनमस्कार करावे लागतात. तसेच डीप्स मारावे लागतात. त्यामुळे हे व्यायाम जास्त करण्याकडे माझा भर असतो. हा झाला व्यायामाचा भाग; पण त्यासोबतच डाएट करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. राणादा हा एक पेहलवान असल्यामुळे त्याची शरीरयष्टी ऑनस्क्रीन चांगली दिसली पाहिजे म्हणूनच व्यायामासोबत डाएटवर देखील मी कटाक्षाने लक्ष देतो. माझ्या रोजच्या आहारात पाव लिटर दूध, १ लिटर ताक, १५-२० अंडी आणि मांसाहार यांचा समावेश असतो.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -