तापसी पन्नूच्या घरात लगिनघाई, बहीण शगुन म्हणाली – मी लग्नाची अनेक ठिकाणे पाहिली आहेत

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री तापसीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात साऊथच्या चित्रपटांपासून केली आणि त्यानंतर ती मुंबईत आली. आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तिने काम केले. तापसीने तिच्या चित्रपटांद्वारे चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. तापसी तिचे आयुष्य अगदी सोप्या पध्दतीने जगते, ती तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहली आहेच, पण आता तापसीच्या घरी लग्न साराईचे सूर ऐकायला मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून तापसी आपल्या लग्नाची बातमी सगळ्या पासून लापवत होती. मात्र आता तापसीची बहिन शगुन तापसीच्या लग्नासाठी वेडिंग वेन्यू शोधत असल्याची महिती समोर आली आहे. शगुन स्वत: वेडिंग प्लानर आहे. तापसीच्या लग्न विषयी शगुन म्हणाली ,’मी लग्नासाठी लोकोशंस बघत आहे. पण तापसीने तिच्या लग्नाविषयी अजुनही कोणते व्यक्तव्य केले नाही.

गेल्या महिन्यात तापसीने म्हटले होते की, तिचे आईवडील घाबरतात की ती लग्न कधीही करणार नाही. तिचे आईवडील तिला सतत विनंती करत असतात लवकरात लवकर लग्न करण्याची. तापसीने तिच्या आईवडीलांना पसंत नसलेल्या मुलाशी लग्न करणार नाही असे देखील म्हटले होते. त्याच बरोबर ती रिलेशनशिपमध्ये टाइमपास देखील करणार नाहीय.

तापसीच्या चित्रपटांन बद्दल बोलायच तर, तिचा मागचा चित्रपट ‘हसीन दिलरुबा’ यातल्या तिच्या भुमिकेचे खूप कौतुक झाले होते.आगामी चित्रपट रश्मी रॉकेट, लूप लॅपेटा, दोबारा, शाबास मिठू आणि ब्लर यांचामध्ये तापसी प्रमख भुमिकेत पाहायला मिळणार आहे. तिच्या येत्या चित्रपटांसाठी प्रेक्षक उत्सुकत आहेतच, पण तापसी लग्नाची बातमी ऐकण्यासाठी देखील चाहते उत्सुक आहेत.