घरमनोरंजनयामी गौतम हिने असा साजरा केला बर्थ डे

यामी गौतम हिने असा साजरा केला बर्थ डे

Subscribe

यामी गौतम हिने वाढदिवसाच्यानिमित्ताने पोल डान्सचा व्हिडीओ पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर शेअर करत वाढदिवस साजरा केला असून, अजून अधिक सोशल मिडीयावर अपलोड करावे अशी मागणी यामीच्या चाहत्यांने केली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम हिचा आज वाढदिवस असून ती ३० वर्षांची झाली असून त्यानिमित्ताने तिने एक व्हिडीओ सोशल साईटवर शेअर केला आहे. जुलै महिन्यात तिने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. आज वाढदिवसाच्यानिमित्ताने तिच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये यामी पोल डान्स करताना दिसत आहे. आतापर्यंत १४ लाखांहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. यामीचा हा पोल डान्स तिच्या चाहत्यांना आवडला असून तिने डान्स करतानाचे अजून काही व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करावे अशी मागणी तिच्या चाहत्यांनी केली आहे.

- Advertisement -

अनेक भाषांमध्ये यामीने केले काम

यामी गौतम हिचा २८ नोव्हेंबर १९८८ साली हिमाचल प्रदेशमधील विलासपूर येथे जन्म झाला आहे. मात्र तिचे बालपण चंदीगढमध्ये गेले आहे. यामी हिने पंजाबी, तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा अनेक भाषांमध्ये काम केले आहे. यामी हिला घरांची सजावट आणि गाणे ऐकण्याची प्रचंड आवड आहे. विकी डोनर या चित्रपटातून यामीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याआधी तिने अनेक टीव्ही सिरीयल आणि अनेक दाक्षिणात्य चित्रपटातही अभिनय केला होता. तसेच ‘चांद के पार चलो’, ‘राजकुमार आर्यन’, ‘ये प्यार न होगा कम’ आणि ‘मीठी छुरी नं १’ यामध्ये यामीने प्रमुख भूमिकेमधये काम केले आहे. त्याचप्रमाणे तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -