घरफिचर्सआंबेडकरवादी विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे

आंबेडकरवादी विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे

Subscribe

गंगाधर यांचे डी.सी. मिशन स्कूल येथे प्राथमिक शिक्षण झाले. तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे माध्यमिक शिक्षण झाले. त्यांच्या वयाच्या ९ व्या वर्षी १९४६ मध्ये बाबासाहेब जेव्हा नागपूरमध्ये आले होते तेव्हा त्यांना पाहून ते अतिशय प्रभावित झाले होते. दुसर्‍यांदा जेव्हा बाबासाहेब नागपुरात आले तेव्हा त्यांना पानतावणे यांना भेटण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा योग आला.

डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे हे लेखक, संशोधक, समीक्षक व आंबेडकरवादी विचारवंत होते. ते पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, वैचारिक साहित्याचे एक निर्माते व अस्मितादर्श चळवळीचे जनक होते. त्यांनी अनेक कवि-लेखकांच्या पुस्तकांना विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत. गंगाधर पानतावणे यांचा जन्म २८ जून १९३७ रोजी नागपूरमधील पाचपावली वस्तीत झाला. त्यांचे वडील विठोबा जास्त शिकलेले नव्हते, परंतु ते बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी चळवळीशी जोडलेले होते. त्यांचे आडनाव ‘पानतावणे’चा अर्थ होता पाणी गरम करणारे. गरिबीमध्ये त्यांचे जीवन व्यतीत झाले. गंगाधर यांचे डी.सी. मिशन स्कूल येथे प्राथमिक शिक्षण झाले. तर नवयुग विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे माध्यमिक शिक्षण झाले. त्यांच्या वयाच्या ९ व्या वर्षी १९४६ मध्ये बाबासाहेब जेव्हा नागपूरमध्ये आले होते तेव्हा त्यांना पाहून ते अतिशय प्रभावित झाले होते. दुसर्‍यांदा जेव्हा बाबासाहेब नागपुरात आले तेव्हा त्यांना पानतावणे यांना भेटण्याचा आणि त्यांच्याशी बोलण्याचा योग आला. १९५६ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गगंगाधर पानतावणे यांनी नागपूर महाविद्यालयातून बी.ए.ची आणि एम.ए.ची पदवी मिळवली. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. १९६३ मध्ये पानतावणे नागपूरहून औरंगाबादमध्ये स्थायिक झाले. तिथल्या मिलिंद महाविद्यालयामध्ये त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. औरंगाबादमध्येच त्यांनी साहित्य चळवळ सुरू केली; तिला तरुणांचा आणि विचारवंतांचा मोठा पाठिंबा मिळाला. ‘‘दलित साहित्याने अंधार नाकारला आहे, कलंकित भूतकाळ नाकारला आहे. मानसिक गुलामगिरीतून दलित मुक्त होऊ पाहत आहेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानातून ते तेजस्वी होत आहेत,’’ अशा शब्दांत दलित साहित्याची पाठराखण करत पानतावणे यांनी महाराष्ट्रातील साहित्यिकांची मोठी फळी घडवली. मराठवाडा विद्यापीठातून ते १९८७ साली पी.एच.डी. झाले. पी.एच.डी.साठी त्यांनी बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर ‘पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा शोधप्रबंध लिहिला. त्यानंतर याच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. पानतावणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. अस्मितादर्श या वाङ्मयीन नियतकालिकाचे संस्थापक संपादक होते.

सॅनहोजे (अमेरिका) येथे पार पडलेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. यासोबतच विदर्भ साहित्य संमेलन (आनंदवन वरोरा), मराठवाडा साहित्य संमेलन (परभणी), या व इतर अनेक साहित्य संमेलनांचे ते अध्यक्ष होते. साहित्य, समाज आणि संस्कृती या विषयांवरील त्यांनी एकूण २० वैचारिक व संशोधनपर ग्रंथ प्रकाशित केले आहेत. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात त्यांनी शोधनिबंध सादर केले होते. त्यांची लेखणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शाहू महाराज ह्यांच्या विचारधारेतून निर्माण झाली. अशा या महान संशोधकाचे २७ मार्च २०१८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -