घरक्रीडाकॅप्टन ते कर्नल

कॅप्टन ते कर्नल

Subscribe

खेळाडू आणि सैनिक. प्रत्येक देशासाठी भूषणावह अशी ही क्षेत्र असतात. एक देशाची कीर्ती सीमेपलीकडे नेण्याची कामगिरी करतात, तर सैनिक स्वतःच्या कुटुंबाचा त्याग करून देशाच्या सीमा सुरक्षित राहाव्यात म्हणून प्राणही देतात. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात सैनिकांबद्दल नितांत आदर असतो. परंतु, खेळाडूंचे ग्लॅमर सैनिकांना आणि सैनिकांचा आदर खेळाडूंना मिळेलच असे नाही. परंतु, काही व्यक्ती अशा असतात ज्यांना देशात या दोन्ही गोष्टी प्राप्त होतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे महेंद्रसिंग धोनी.

धोनी म्हणजे भारतीय क्रिकेटला महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या खेळाडूंपैकी एक. क्रिकेटच्या दोन्ही प्रकारात देशाला वर्ल्डकप मिळवून देणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. त्यामुळे धोनीबद्दल भारतीय क्रीडारसिकांच्या मनात आदर आणि प्रेम हे होतेच. परंतु, त्याच्या सैन्यात जाण्याच्या निर्णयाने अनेकांच्या गळ्यातील तो ताईत बनला आहे. कारण त्याने भारतीय सैनिकांसोबत प्रशिक्षण घेण्याचा घेतलेला निर्णय.

- Advertisement -

परंतु, धोनीचं सैन्यात सामील होणं हे वरवरचं मुळीच नाही. माणूस भरपूर खोल जावा लागतो. सैन्याबद्दल धोनीला आकर्षण असले तरी सैन्याची रणनीती, कोणत्याही परिस्थितीत शांत डोक्याने विचार करणे, गरज असेल तेव्हा खेळातून आक्रमकता दाखवणे हे काही गुण धोनीने जाणीवपूर्वक अंगिकारले. त्यामुळेच कदाचित धोनीला सैनिक आणि सैन्य जवळचे वाटतात. सैनिकांसारखी तंदुरुस्ती त्याने अजूनही जपली आहे हे विशेष. वर्ल्डकपमध्ये सैन्याचा लोगो हॅन्डग्लोव्हजवर लावल्यामुळेदेखील धोनी वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. धोनीच्या क्रिकेटच्या किटवरदेखील सैन्याची झलक दिसते.

इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये संथ धावगतीमुळे धोनी टीकेचं लक्ष्य ठरला होता. कोणी कोणी तर त्याला निवृत्त करून टाकला. त्यानंतर विंडीज दौर्‍यातून माघार घेऊन धोनीने सैन्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीने जम्मू काश्मीरमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. धोनी पॅरा रेजिमेंटच्या 106 पॅरा टेरिटोरियल आर्मी बटालियनचा भाग आहे. तो 31 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत युनिटसोबत काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेणार आहे. हे युनिट व्हिक्टर फोर्सचा भाग आहे. या ट्रेनिंगदरम्यान धोनी पेट्रोलिंग, गार्ड आणि पोस्टची ड्यूटी करणार आहे.

- Advertisement -

यावेळी जवान त्याच्यासोबतच असतील. भारतीय टेरिटोरियल आर्मीने 2011 मध्ये धोनीला लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी दिली होती. लेफ्टनंट कर्नल धोनीबाबत भारतीय सैन्याने माहिती दिली की, ‘तो पॅरा रेजिमेंटचा भाग असेल. धोनी 106 टेरिटोरियल आर्मी बटालियन (पॅरा) सोबत 31 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत राहील. हे युनिट काश्मीरमध्ये असून व्हिक्टर फोर्सचा भाग आहे. यादरम्यान त्याच्यावर पेट्रोलिंग, गार्ड आणि पोस्टची ड्यूटी असेल. शिवाय तो जवानांसोबतच राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -