घरफिचर्सगड्या, अपुली शेती बरी !

गड्या, अपुली शेती बरी !

Subscribe

छोटे साहेब बरेच दिवस चिंतेत दिसत होते.नेमकं त्यांच्या मनात काय चालू आहे,हे सांगणे कठीण होते.जसजशी निवडणूक जवळ येत होती,तस तशी दिवसेंदिवस सायबांसमोर नोटीसांच्या अडचणी वाढत चालल्या होत्या.त्यात आता खुद्द मोठ्या सायबांना देखील नोटीस आली होती. सत्ताकाळात अनेक चुकीची विधाने केल्याने छोट्या साहेबांना खुर्ची देखील गमवावी लागली होती.त्यात विरोधकांनी त्यांचे सगळे सहकारी नेल्यामुळे निवडणुकीत छोट्या साहेबांना अधिकच उद्विग्नता आली होती.आगामी निवडणुकीत आवश्यक ती ‘जित’मिळवण्याची ‘पॉवर’ त्यांना दिसत नव्हती. सायबांना आता काय करावं हे सुचत नव्हतं.सायबांनी आपला मोठा मुलगा पिंट्याला जवळ बोलावलं,लेका! छोटे साहेब, जरा गहिवरूनच बोलले!,आता,आपण आपल्या गावी जावू,दोन चार एकर जमीन आहे,तिथे पुन्हा शेती करू,दुधाच्या जुन्या कितल्या आहेत त्या तेवढ्या बाहेर काढून ठेव.’ या गलिच्छ राजकारणापेक्षा आपण गाई-म्हशींच्या सानिध्यात दिवस घालवू,साहेब भावूक होवून बोलत होते.पिंट्याला देखील काय बोलावं सुचत नव्हतं.छोट्या सायबांना आता फक्त शांतता हवी होती.त्यांनी आजूबाजूच्या कार्यकर्त्यांना निघून जायला सांगितलं.फोन बंद करून टाकला.सगळे संपर्क तोडून टाकले आणि आपल्या फार्महाऊसवर अज्ञातवासात निघून गेले.दुसर्‍या दिवशी ब्रेकींग न्यूजमध्ये ‘छोटे साहेब वॉन्टेड’ याचीच चर्चा होती. त्यामुळे अनेक शक्यतांना ऊत आला होता.कोणी छोटे साहेब मोठ्या सायबांना जुमानत नाहीत असे म्हणत होते,कोणी ते आता दुसरा पक्ष स्थापन करणार तर आपल्या इतर सहकार्‍यांप्रमाणे ते पण सत्ताधारी पक्षाची वाट धरणार,अशा चर्चा झडत होत्या.दिवसभर गायब असलेल्या छोट्या सायबांनी दिवसभराचं मार्केट खाल्लं होतं.सर्वात मोठा घोर हा मोठा सायबांना लागून राहिला होता.एकंदरित पक्षाला लागलेली गळती पाहता,आता भगदाड पडणार का? आणि धरणं कोरडं तर होणार नाही ना? याची चिंता मोठ्या सायबांना होती.अखेर बाबा,शेती करणार आहेत असा गौप्यस्फोट पिंट्याने केला आणि पुन्हा एकदा ब्रेकींग न्यूजचा सिलसिला सुरू झाला.राजकारणाकडून आता पुन्हा शेती करण्याच्या कल्पनेने मोठे साहेब थोडे चक्रावलेच.गेल्या 70 वर्षांच्या काळात देशातील शेतीची उत्तरोत्तर प्रगती पाहता,हे क्षेत्र म्हणून छोट्या सायबांनी पुन्हा निवडणे मोठ्या सायबांना पसंत पडले नव्हते. तसेच शेती हा जरी आपला व्यवसाय असला तरी राजकारणाने आपल्याला जगवले आहे,याची पूर्ण जाणीव मोठ्या सायबांना होती.त्यामुळे छोट्या सायबांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर होते.त्यात त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय यांची कल्पना देखील त्यांना नव्हती.अखेर मोठ्या सायबांसाठी छोटे साहेब रिचेबल झाले.गेल्या काही महिन्यांचे दु:ख सायबांसमोर कथक केले. कुठे ,आता वातावरण आपल्या बाजूने होतं होत आणि त्यात पुन्हा मीठाचा खडा पडला की काय याची भिती सायबांना होती. अखेर मोठ्या सायबांनी छोट्या सायबांची मनधरणी केली आणि शेतीवरून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोठ्या सायबांचा जीव भांड्यात पडला.दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही साहेब ‘ब्रेकींग न्यूज’मध्ये राहण्यात यशस्वी झाले होते.निवडणुकीच्या ऐन तोंडावर आपला ‘टाईम’ शोधण्यात यशस्वी झाले होते.

(गेले दोन दिवस दोन्ही सायबांनी दिवस रात्र नांगरून जे काही पेरलं आहे,त्याचं पिक आगामी निवडणुकीच्या कसं येतं? यावर आता सायबांच्या ‘राजकीय शेती’चं भविष्य अवलंबून आहे.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -