घरफिचर्समांसाहार प्रेमींसाठी खास 'गटारी महोत्सव'

मांसाहार प्रेमींसाठी खास ‘गटारी महोत्सव’

Subscribe

मांसाहार प्रेमी लोकांसाठी श्रावण हा महिना काहीसा कठीण जाणारा असतो.त्यामुळे मांसाहार करणारे लोक आषाढ महिन्यातच आपल्या जिभेचे चोचले पुरवून घेतात. त्यातही विशेष महत्त्व असतं ते आषाढ अमावस्या म्हणजेच गटारी अमावस्या..

आता सर्वांना चाहून लागली आहे ती श्रावण महिन्याची. पवित्र महिना अशी ओळख असलेल्या श्रावण महिन्यापासून विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे बरेच लोक या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, मांसाहार प्रेमी लोकांसाठी हा महिना काहीसा कठीण जाणारा असतो. त्यामुळे मांसाहार करणारे लोक आषाढ महिन्यातच आपल्या जिभेचे चोचले पुरवून घेतात. त्यातही विशेष महत्व असतं ते आषाढ अमावस्या म्हणजेच गटारी अमावास्येला. अमावास्येला मांसाहारांची मोठी चंगळच आपल्याकडे दिसून येते. अशा या मांसाहारप्रेमी खवय्यांसाठी खडपेज् – मालवणी, कोकणी लज्जत मध्ये गटारी महोत्सव भरवण्यात आला आहे. मालवणी जेवणाची लज्जत चाखू इच्छिणार्‍या तमाम खवय्यांची यंदाची गटारी अविस्मरणीय करायची असेल, तर या हॉटेलमध्ये नक्की जा. कारण, आईच्या हाताची चव असणार्‍या खडपेज यांच्या जिन्नसांचा आस्वाद घेण्याची संधी १४ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान खवय्यांना लाभणार आहे. या खास गटारी विशेष दिवसांमध्ये खडपेज् – मालवणी, कोकणी लज्जत च्या मेन्यू कार्डवर ओला जवळा भजी, बोंबील भजी, कालवं रोल, चिकन मिसळ, मटण खिमा मिसळ आणि बिस्कीट अंबाडे अशा खास डिशेसचा समावेश करण्यात आला असून, हे सर्व जेवण अगदी माफक दरात लोकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

कोकणी जेवण म्हंटले, की सर्वात आधी नजरेसमोर येतात ते मासे. समुद्रातील ताजे आणि सुके असे दोन प्रकारचे मासे जेवणाची लज्जत वाढवत नसतील तर नवलच ! तळकोकणातील या घरगुती लज्जतीचा आस्वाद शहरात मिळणे तसे दुर्मिळच. मात्र, प्रभादेवीच्या अप्पा साहेब मराठे मार्गावर असलेल्या खडपेज् – मालवणी, कोकणी लज्जत मध्ये ते शक्य आहे.कारण, कामानिमित्त शहरात स्थायिक झालेल्या कोकणी माणसाला घरगुती पद्धतीच्या मालवणी जेवणाची चव या रेस्टॉरंटमध्ये अनुभवता येते.

- Advertisement -

शेफ पंकज नेरुरकर आणि विशाल करंगुटकर यांच्या या छोटेखानी रेस्टॉरंटमध्ये खवय्यांना अस्सल कोकणी-मालवणी पदार्थांची लज्जत चाखता येते. आपल्या आईकडून शिकल्यामुळे आईच्या हाताची चव या पदार्थात उतरली असल्याचे शेफ पंकज नेरुरकर इथे सांगतात.

आईने बनविलेल्या जेवणाला तोड नसते. आईच्या याच जेवणाची खासियत या रेस्टॉरंटमध्ये चाखायला मिळते. पापलेट, सुरमई, रावस , बांगडा, बोंबील, मांदेळी या माशांचा फ्राय डिशपासून ते अगदी बोंबील भुजणं, किसमूर, मोरीचं कालवण,कुर्ल्या मसाला, तिसर्‍या सुके ,जवळा मसाला, कोलंबी कोळीवाडा आणि खेकडे असे एकामोगामाग एक तोंडाला पाणी सुटेल अशा रुचकर मेजवानीचे मेन्यूकार्डच इथे आपल्याला मिळते.

- Advertisement -

मालवणची अगदी पारंपरिक पद्धतीनं केलेली कोळंबी डिश खवय्यांना एक वेगळा आनंद देऊन जाते. तव्यावर खरपूस तळलेल्या या कोळंबीचा आस्वाद आणि दरवळणारा सुगंध खाणार्‍यांचा आत्मा तृप्त करून टाकतो.थाळीची आवड असणार्‍यांसाठी चिकन, मटण, फिश, अंडा, व्हेज अशा सर्व थाळ्या तुम्हाला येथे मिळतील. शिवाय मांसाहारी स्पेशल आणि तळलेले मासे या शीर्षकाखालीही अनेक पर्याय इथे उपलब्ध आहेत.

खडपे हे तळकोकणातले प्रसिद्ध आचारी. त्यांचं जेवण चवीला अप्रतिम असतं. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम म्हणून पंकज यांनी आपल्या रेस्टॉरंटचं नाव खडपेज् ठेवलं आहे. इथे लागणारा प्रत्येक मसाला आणि तेल कुडाळला त्यांच्या गावाहून तयार होऊन येतं. तिथे त्याचं स्वत:चं कांडप मशीन आणि खोबर्‍याच्या तेलाचा घाणा असल्याने भेसळीची शक्यता नसते आणि प्रत्येक गोष्टीचं योग्य प्रमाण वापरून हवा तसा मसाला तयार केला जातो. तसेच, पदार्थ बनविण्यासाठी लागणारे मासे स्वतः पंकज बाजारातून खरेदी करत असल्यामुळे या रेस्टॉरंटमध्ये पाऊल टाकताच स्वयंपाकघरातून येणार्‍या मसाल्याच्या आणि ताज्या मासळीच्या वासाने जीभ ही चाळवतेच !

याचे सर्वात मोठे वैशिष्ठये म्हणजे, इथल्या पदार्थांचे दर अगदी माफक आहेत. त्यामुळे खिशाला फार फटका बसत नाही. येथे अस्सल मालवणी आणि नॉनव्हेज पदार्थांची चव चाखायला दूरदूरून खवय्ये येतात. येथे व्हेज थाळीदेखील आहे. त्यात काळ्या वाटाण्याची उसळ, वालाची आमटी, मटकीची उसळ आणि भाजणीच्या पिठातून तयार करण्यात येणारे भाजणी वडे, तांदळाच्या भाकर्‍या आहेत. मोदक आणि श्रीखंड हे गोड पदार्थदेखील इथे सुरेख मिळतात.
त्यामुळे, आषाढ महिन्याच्या बेधुंद पावसाळ्यात जिभेला मालवणी पदार्थ खाण्याची लत लागली असेल तर खडपेज् – मालवणी, कोकणी लज्जत मध्ये नक्कीच जा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -