घरफिचर्सनिवडणूक प्रक्रियेचे आधारस्तंभ

निवडणूक प्रक्रियेचे आधारस्तंभ

Subscribe

भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात मतदाराला ओळख देऊन निष्पक्ष पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडावी यासाठी धडाकेबाज निर्णय घेतलेल्या टी.एन.शेषन यांना ८ जुलै २००६ साली रॅमन मॅगसेसे हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला.

टी.एन.शेषन. भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात मतदाराला ओळख देऊन निष्पक्ष पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडावी यासाठी धडाकेबाज निर्णय घेतलेल्या टी.एन.शेषन यांना ८ जुलै २००६ साली रॅमन मॅगसेसे हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला. आशियाचा नोबेल म्हणून मॅगसेसे पुरस्काराची ओळख आहे. त्यामुळे टी. एन. शेषन यांना हा पुरस्कार जाहीर करण्यामागे त्यांची कामगिरीही तेवढीच कौतुकास्पद असणार यात शंकाच नाही. त्यामुळे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांची आज आवजूर्न आठवण येते. त्यातही आपल्या निवडणूक यंत्रणेविरोधात झालेल्या तक्रारींचा लेखाजोखा पाहाता आज शेषन यांची आठवण आल्याविना राहत नाही. टी.एन.शेषन अर्थात तिरूनेल्लरी नारायण अय्यर शेषन. १५ डिसेंबर १९३२ रोजी केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यातील तिरूनेल्लरी या गावी टी.एन.शेषन यांचा जन्म झाला. १९५५ साली शेषन आयएएस परीक्षा सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्या तुकडीतील टॉपर्समधील एक टी.एन.शेषन होते. १९१० साली भारताचे १०वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टी.एन.शेषन यांची निवड झाली. १९९० ते १९९६ पर्यंत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तपदाची जबाबदारी चोख बजावली. या काळात भारतातील निवडणूक प्रक्रियेचा चेहरा-मोहरा बदलण्याचे महत्त्वपूर्ण काम टी. एन. शेषन यांनी केले. या काळात त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांची आजच्या निवडणूक प्रक्रियांमध्येही कडक अंमलबजावणी केली जाते. शेषन यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड होण्यापूर्वी भारतीय निवडणूक प्रक्रियेला मुख्य निवडणूक आयुक्ताचे कार्यच माहीत नव्हते. मतदान ओळखपत्राच्या स्वरूपात मतदाराला ओळख देण्याचे महत्त्वाचे कार्य शेषन यांनी केले. एवढेच नाही तर मतदार ओळखपत्राशिवाय मतदान करता येणार नाही, त्यामुळे मतदान ओळखपत्र अनिवार्य करण्याचे कामही त्यांनी केले. टी.एन.शेषन एवढ्यावरच थांबले नाहीत. निवडणूक प्रक्रियेला शिस्त लावण्याचे सर्वात महत्त्वाचे कार्य त्यांना करायचे होते. त्यासाठी त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले. या निर्णयांना आडकाठी करणार्‍यांना न जुमानता रोखठोक निर्णय घेत भारतीय निवडणुकांना पारदर्शक अणि निष्पक्ष करण्याचा प्रयत्न केला. एका वाक्यात मुद्देसूद उत्तर देण्याच्या त्यांच्या रोखठोक भूमिकेने मोठमोठ्या दिग्गजांची बोलती बंद केली. त्यांच्या रोखठोक भूमिकेवर विरोधकांनी त्यांच्यावर व्यक्तीशः टीकासुद्धा केली. मात्र, टी.एन.शेषन यांनी विरोधकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत भारतीय निवडणूक प्रक्रियेचा चेहरामोहरा बदलून टाकला. १९६० पासून निवडणुकांमध्ये लागू करण्यात आलेल्या आचारसंहितांचं योग्य पालन होत नसल्याचे शेषन यांच्या लक्षात आले. तेव्हा टी.एन. यांनी सर्व उमेदवारांसह नेत्यांना आचारसंहितेचं कठोर पालन करण्यास भाग पाडले. मतदाराला भूलविण्यासाठी उमेदवाराकडून होणार्‍या वारेमाप खर्चाला लगाम बसविण्याचे कार्य शेषन यांनी केले. यामध्ये मतदारांना पैसे, महागड्या वस्तू देण्यावर बंदी, निवडणुकांच्या काळात दारू वाटप गुन्हा ठरविणे, जाती-धर्मासारख्या भावनिक मुद्द्यांच्या आधारे निवडणूक लढवू नये, यामध्ये निवडणूक प्रचारासाठी धार्मिक स्थळांचा वापर करण्यास बंदी, परवानगीशिवाय तसेच मोठमोठ्या आवाजात गाणी वाजवण्यावर बंदी यासारखे महत्त्वाचे निर्णय टी.एन.शेषन यांनी घेतले. हे झाले उमेदवारांना शिस्त लावण्याचे काम. पण त्याहून अधिक महत्त्वाचे काम टी. एन. शेषन यांनी केले. ते म्हणजे निवडणूक अधिकार्‍यांची योग्य ठिकाणी नेमणूक. तसेच, पोलीस अधिकारी आणि निवडणूक अधिकार्‍यांना निवडणूक प्रक्रियेचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचे कार्य भारताचे माजी निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन यांनी पार पाडले. त्यामुळेच आजही निवडणूक अधिकारी ज्या भागातील आहे, त्या भागात त्याची नेमणूक कधीच होत नाही. त्यामुळे निवडणूक मुख्य आयुक्त हा सरकारचा निवडणूक आयुक्त नसून देशाचा निवडणूक आयुक्त असल्याचे टी.एन. शेषन यांनी आपल्या कारकिर्दीतून पटवून दिले. अशाप्रकारे टी.एन.शेषन यांनी निवडणुकांमधील निवडणूक आयुक्तांची ठोस भूमिका तयार केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -