घरफिचर्ससारांशनोकरी गेली, उद्योग सुरु करत आहात...सावधान!

नोकरी गेली, उद्योग सुरु करत आहात…सावधान!

Subscribe

कोरोनामुळे नोकरी गेली, जे काय रोजगार नवीन निर्माण होणार होते ते निर्माण होण्याची थांबले आणि बेरोजगारी दिवसेंदिवस वाढतच आहे . सेंटर फार मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (उचखइ ) ह्या केंद्र शासनाच्या संस्थेची काही आकडेवारी आपण आता बघू . जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 ह्या महिन्यामध्ये खालील प्रमाणे लोक नोकरी करत होते .

जानेवारी 2021 40. 07 कोटी
फेब्रुवारी 2021 39. 82 कोटी
मार्च 2021 39. 81 कोटी
एप्रिल 2021 39. 07 कोटी .

- Advertisement -

ह्याच कालावधीतील राष्ट्रीय बेरोजगारी दर हा खालील प्रमाणे होता :-
जानेवारी 2021 6.52 %
फेब्रुवारी 2021 6. 89 %
मार्च 2021 6.50 %
एप्रिल 2021 7. 97 %

ह्याच कालावधीत बेरोजगार लोक कि जे नोकरीच्या प्रतीक्षेत आहे त्यांची संख्या खालील प्रमाणे होती :-
जानेवारी 2021 2. 79 कोटी
फेब्रुवारी 2021 2. 94 कोटी
मार्च 2021 2. 76 कोटी
एप्रिल 2021 3. 38 कोटी .

- Advertisement -

वरील माहितीवरून असे लक्ष्यात येते कि जानेवरी 2021 मधील जे 40.07 कोटी नोकर्‍या होत्या त्या एप्रिल मध्ये 39. 07 कोटीवर आल्या . 1 कोटी नोकर्‍या कमी झाल्या व तेवढेच लोक बेरोजगार झाले . जानेवारी 2021 मधील बेरोजगारी दर हा 6. 52 % होता तो एप्रिल 2021 अखेर 7. 97 % झाला . जानेवारी 2021 मध्ये 2.79 कोटी लोक नोकरीच्या प्रतीक्षेत होते तीच संख्या एप्रिल 2021 मध्ये 3.38 कोटी झाली . यावरून रोजगाराची किती भयावह परिस्थिती आहे हे आपल्या लक्ष्यात येईल .

हि झाली फक्त सरकारी आकडेवारी . जे असंघटित क्षेत्रातील बेरोजगार आहे ज्याची कुठे नोंद होत नाही ती संख्या सुद्धा भयावह आहे . अनेक छोटे उद्योग बंद झाले व त्यातील रोजगार कायमस्वरूपी गेले . हॉटेल टुरिझम मधील रोजगार सुद्धा अजून काही काळ पूर्वपदावर येते नाही , मोठे उद्योजक अजून घाबरून आहे ते गुंतवणूक करण्यास पुढे येत नाही कारण आजून कोरोनाच्या अनेक लाटांची भीती आहेच . भारतात 80 ते 90 टक्के लसीकरण होण्यास जानेवारी 2022 उजाडेल असा वैद्यकिय क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे .

वरील सर्व आकडेवारी देण्याचा उद्देश हाच कि बेरोजगारांनी करायचे काय ? निश्तितच ह्या लेखाचा उद्देश हा आहे कि आपल्या मराठी तरुणांनी छोटा मोठा उद्योग सुरु करावा हा आहे . नोकरीला पर्याय म्हणून अनेक मराठी तरुण हे उद्योग किंवा व्यवसाय कडे वळत आहे परंतु उद्योग व्यवसायाकडे वळण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे. व्यवसाय उद्योगात प्रचंड संधी आहे हे आता लक्षात आले आहे आणि सरकारकडे सुद्धा आता देण्यासाठी नोकर्‍या नाही. असे म्हटले जाते की जे काही नवीन व्यवसाय सुरू होतात त्यातील फक्त पाच ते सहा टक्के व्यवसाय हे पुढे चालू असतात आणि 95 टक्के व्यवसाय सुरू केल्यापासून वर्षभरामध्ये बंद झालेले असतात . याचे अनेक कारणे आहे हे समजावून घेणे आवश्यक आहे तसेच अतिशय कमी वेळेत शून्यातून उद्योगाचा मोठा विस्तार करणारे उद्योजक सुद्धा आहे. मराठी तरुणांनी उद्योग व्यवसाय सुरू करण्याआधी काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्या महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे:

1. स्वतःची केवायसी करा : आपल्याला सर्वांना माहीत आहे कि केवायसी म्हणजे ज्ञपेु र्ूेीी र्लीीीेांशी परंतु इथे त्याचा असा अर्थ अभिप्रेत नसून ज्ञपेु र्ूेीी लररिलळश्रळींळशी हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे याला मराठीत स्वतःच्या क्षमता ओळखा असे म्हटले जाते . यासाठी आपण जरा हिंदू संस्कृतील देवांकडे वळू या . ब्रह्मा-विष्णू-महेश हे जे देव आहे त्या देवांचा आपण काही संदर्भ उद्योजकतेशी लागतो का हे बघू या . ब्रह्मा जो आहे तो हा विश्वाचा निर्माता आहे असे मानले जाते तसेच नवउद्योजक जो आहे तो स्वतःचे विश्व निर्माण करण्यासाठी उद्योग धंदा सुरू करत असतो . आणि हे उद्योगाचे विश्व निर्माण करताना छोट्या पासून सुरु करा . शुन्यातून सुद्धा आपण स्वतःचे विश्व निर्माण करू शकतो याची प्रेरणा आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे कडून घेऊ शकतो . स्वराजच्याची शपथ घेताना फक्त काही निवडक मावळे होते व हळू हळू हिंदवी स्वराज्य उभे राहिले . उद्योजक शिव छत्रपती यावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहे . ब्रह्मा ची पत्नी आहे ती आहे सरस्वती आपल्या हिंदू संस्कृती मध्ये विद्येची देवता या नात्याने आपण सरस्वती कडे बघतो . उद्योग व्यवसाय सुरु करताना सुद्धा आपण जी काही आवश्यक विद्या आहे जे काही उद्योगाचे व्यवसायाचे आवश्यक ज्ञान आहे ते मिळवणे गरजेचे आहे तरच तुम्ही तुमचे स्वतःचे विश्व निर्माण करू शकाल. ज्या व्यवसायात उतरायचे आहे त्यात सखोल ज्ञान मिळवा हा येथे सांगण्याचा हेतू आहे . युट्युब व गुगल हा माहितीचा खजाणा आहे फक्त त्याचा वापर आपण योग्य रीतीने करणे गरजेचे आहे .

दूसरा जो देव आहे तो म्हणजे विष्णू . विष्णू हा देव अनेक अवतार घेत असतो त्याला आपण विष्णूचे वेगवेगळे अवतार म्हणतो. उद्योजकाला सुद्धा वेगवेगळ्या अवतारात काम करावे लागते कधी तो मालक असतो कधी त्याला नोकर व्हावे लागते कधी त्याला मार्केटिंग करावी लागते कधी त्याला फायनान्स बघावा लागतो तर कधी त्याला प्रोडक्शन सुद्धा बघावे लागते म्हणजे विष्णू सारखे वेगवेगळे अवतार तुम्हाला घेता आले पाहिजे . त्याला जोडून विष्णूची पत्नी आहे तिला लक्ष्मी असे म्हटले जाते आणि उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी लक्ष्मी ही फार महत्वाची असते. तुमच्या कडे किती भांडवल आहे ते बघून सुरवात करा उगाच मोट्या उड्या मारू नका . तिसरा जो देव आहे तो महेश ज्याला आपण महादेव म्हणतो . तो सुद्धा फार महत्त्वाचा देव आहे ज्याला आपण भोळा शंकर म्हणतो त्याची मनोभावे पूजा केली तर तो भक्तांना पावतो तसेच उद्योग व्यवसायात सुद्धा आपण उद्योगाची आणि व्यवसायाची प्रामाणिकपणे सेवा केली तर तो उद्योग सुद्धा आपल्याला पावतो हे लक्ष्यात ठेवा . महादेवाची अर्धांगिनी आहे पार्वती आणि महादेवाला आपण अर्धनारीनटेश्वर सुद्धा म्हणतो . उद्योजकाने यापासून हे शिकायचे आहे कि उद्योग-व्यवसाय सुरू करताना तुम्हाला तुमची अर्धांगिनी ची साथ फार महत्त्वाची आहे. जे काही तुम्ही उद्योग-व्यवसायाचे निर्णय घेणार असेल ते तुमच्या अर्धांगिनीला माहीत असणे गरजेचे आहे तिच्याशी सल्लामसलत करून निर्णय घेणे गरजेचे आहे. तुम्ही अविवाहित असाल तर पालकांना तुमच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्या. तर असे हे त्रीदेव आहे त्याचा व्यवसाय सुरू करतांनी विचार होणे गरजेचे आहे आणि त्यादृष्टीने उद्योजकांनी ब्रह्मा-विष्णू-महेश ह्या आपल्या देवांकडून प्रेरणा घेणे गरजेचे आहे .

2) पैसे मिळविण्याचे तीन पायर्‍या : यानंतर आपण पैसे मिळवण्याच्या तीन स्टेप आहे त्या बघू. मित्रांनो आपल्याकडे नॉलेज असेल एज्युकेशन असेल अनुभव असेल तर आपल्याला पैसे मिळतातच असे नाही . म्हणूनच आज मोट्या मोठ्या डिग्री घेतलेले लोक घरी बेरोजगार बसले आहे . त्यांनी ह्या तीन स्टेप समजून घेऊन त्याप्रमाणे नियोजन केले तर ते हि बेरोजगार राहणार नाही.

पहिली स्टेप : तुमच्याकडे काय आहे त्यात एक्सपोर्ट बना त्यात भरपूर ज्ञान मिळवा, त्यात भरपूर अभ्यास करा आपल्याकडे डिग्री आहे आपल्याकडे अनुभव आहे आपल्याकडे काही स्किल आहे तर त्यात एक्सपोर्ट बनणे गरजेचे आहे. एकदा त्यात तुम्ही एक्स्पर्ट झाले कि त्यात नेहमी स्वतःला अपडेट ठेवणे गरजेचे आहे . बदल हि न थांबणारी गोष्ट आहे . उदयोग व्यवसायात बदल आणि नावीन्य रोजच घडत असते . बदलला सामोरे जा व त्यानुसार वेगवेगळे बदल तुमच्या व्यवसायात करा.

दुसरी स्टेप : आपल्याकडे जे काय आहे ज्यात पहिल्या स्पेट मध्ये तुम्ही एक्सपर्ट झाले आहेत ते लोकांसमोर आपल्याला घेऊन जायचं आहे आणि त्यालाच मार्केटिंग असे म्हणतात. जोपर्यंत आपल्याकडे काय आहे हे लोकांना समजत नाही तोपर्यंत तुम्ही पैसे मिळवण्याच्या प्रोसेस मध्ये येत नाही . आज अनेक तरुण वेगवेगळ्या डिग्र्या घेऊन घरा मध्ये बसलेले आहे आणि त्यांचा असा गैरसमज आहे की माझ्याकडे आता डिग्री आहे आणि लोकांनी घरी येऊन मला नोकरी दिली पाहिजे किंवा काम दिले पाहिजे . परंतु तुमच्याकडे काय आहे हे जोपर्यंत तुम्ही लोकांना सांगत नाही तोपर्यंत तुम्ही पैसे मिळवण्याच्या प्रोसेस मध्ये पोहोचत नाही . तुम्हाला स्वतःचा उद्योग व्यवसाय करायचा असेल तर मार्केटिंग करणे गरजेचे आहे. सध्या सोशल मीडिया हे मार्केटिंग चे खूप प्रभावी माध्यम आहे. मार्केटिंगचे करताना त्याचा वापर आपण जास्तीत जास्त करणे गरजेचे आहे. बिल गेट्स याचे एक महत्त्वाचे पुस्तक आहे र्इीीळपशीी रीं ींहश डशिशव ेष ङळसहीं . त्यात तो सांगतो कि आपल्या शरीराची जशी मज्जासंस्था असते ( पर्शीीर्ेीीं ीूीींशा ) तशीच तुमच्या उद्योग व्यवसायाची एक डिजिटल पर्शीीर्ेीीं ीूीींशा असने गरजेचे आहे . तुमच्या उद्योग व्यवसाया डिजिटल करण्याला फार महत्व आहे कारण येणारा काळ हा सर्व डिजिटल चा काळ आहे तुमच्या व्यवसायात जर टेक्नॉलॉजीचा वापर नसेल तर तुम्ही लवकरच उद्योगातून बाहेर गेलेले असाल. या टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग करू शकता. फेसबुक व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम प्रभावी आणि कमी खर्चाचे मार्केटिंग टूल आहे तुमच्या स्वतःचे जे काही फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट आहे त्या वॉर आपण काहीतरी विनोद , याच्या त्याच्या पोस्ट, राजकीय पोस्ट ,धार्मिक पोस्ट फॉरवर्ड करत असतो परंतु स्वतःच्या स्कील बद्दल स्वतःच्या व्यवसायाबद्दल आपण कधीही काही टाकत नाही आपल्या प्रत्येकाचे फेसबुक अकाउंट आहे इंस्टाग्राम अकाउंट आहे त्या माध्यमातून तुमच्याकडे काय स्किल आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम तुम्हाला करायचे आहे. जस जसा व्यवसाय वाढत जाईल तुमचे मार्केटिंग चे बजेट वाढणे गरजेचे आहे

तिसरी स्टेप : नंतर तिसरी महत्वाची स्टेप आहे ही ज्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार आहे ही स्टेप आहे . तिसर्‍या स्टेप मध्ये जेव्हा तुम्ही तुमच्याकडे जे काय आहे ते मार्केटिंग द्वारे बाजारपेठेत घेऊन जातात परंतु मार्केट मध्ये खूप स्पर्धा आहे तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये जे काही कस्टमर आहे जे सध्या दुसरीकडे आहे दुसर्‍याची सेवा किंवा माला घेत आहे ते तुमच्याकडे वळवायचे आहे त्यासाठी व्हॅल्यू ऍडिशन हा शब्द फार महत्वाचा आहे . तुमच्या व्यवसायातून किंवा तुमच्या उद्योगातून ग्राहकाची काही वळून एडिशन होत नाही तोपर्यंत तो तुमच्याकडे वळणार नाही. नावीन्य आणणे खूप गरजेचे आहे . हे नावीन्य अनेक प्रकारे अनु शकता त्याच्यामध्ये किंमत , मालाची गुणवत्ता , सेवेची गुणवत्ता असेल किंवा इतर अनेक गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा विचार करून तुमच्या सेवेने किंवा उद्योगाने जर ग्राहकाचे व्हॅल्यू एडिशन केले तरच तो तुमच्याकडे वळणार आहे आणि तुमचा ग्राहक बनेल आणि तुमची विक्री होईल . जे द्रष्ठे उद्योजक असतात ते बाजारपेठेत कशाची त्रुटी आहे हे नेमकेपणाने हेरून स्वतःचा उद्योग शोधतात . त्यानंतर ते नवा माल किंवा सेवा तरी शोधून काढतात किंवा बाजारात असलेल्या मला किंवा सेवेत कल्पक बदल घडवतात कि तो माल किंवा सेवा सर्वसाधारण माला पुढे वेगळेपणाने उठून दिसेल . द्रष्ठे उद्योजक जे असतात त्यांना इतर व्यवसायाची नक्कल उभी करण्यात कोणताच रस नसतो . स्वतःचे वेगळेपण सिद्ध झाले तरच ग्राहक तुमच्या कडे वळणार आहे हे लक्ष्यात घेणे गरजेचे आहे .

ह्या शेवटच्या स्टेप मध्ये मालाची किंवा तुमच्या सेवेची विक्री होते आणि मगच तुम्हाला पैसे मिळतात.

अशा ह्या पैसे मिळवण्याच्या तीन महत्त्वाच्या स्टेप आहे ह्या तीन स्टेप सतत चालणार्‍या स्टेप आहे या तीन स्टेप मध्ये तुम्हाला सतत काम करायचे आहे जर तुम्ही ह्या तीन स्टेप मध्ये काम बंद केलं तर तुमचा उद्योग व्यवसाय हा थांबला जाणार आहे त्यामुळे या तीन स्टेप या कायम चालणार्‍या स्टेप आहे.

3) उत्पादनाच्या आधी ट्रेडिंग करा : रतन टाटा याना एकदा एका मुलाखतीत विचारले कि नवउद्योजकांना तुम्ही काय सल्ला द्याल . त्यांचे उत्तर होते, याचा अर्थ असा आहे कि तुम्हाला कुठलाही मालाचे उत्पादन सुरु करावयाचे असेल तर त्यात आधी ट्रेडिंग सुरु करा. ट्रेडिंग चा अनुभव घ्या त्यामुळे तुम्हाला त्या व्यवसायातील उत्पदनापासून थेट ग्राहकापर्यंत ची साखळी असते त्यात अनेक गोष्टी शिकण्याचा अनुभव येतो . त्यातील बारकावे काय आहे याचा अनुभव येतो आणि मगच तुम्ही उत्पादन सुरु करा. अनेक मोठे उद्योगपती त्यांच्या मुला मुलींना आधी ट्रेडिंग करून व्यवसायाचा अनुभव घेण्याचा सल्ला देतात. हे हि महत्वाचे समजून घ्या कि अमेझॉन हि कंपनी सर्व मालाची विक्री करते परंतु तिचे कुठलेही ारर्पीषरर्लीीींळपस युनिट नाही. ओला हि कंपनीची एक सुद्धा मालकीची कार नाही तरी ती तुम्हाला सेवा देते . स्वीगी चे कुठलेहि हॉटेल नाही तरी तुम्हाला ती घरपोच खाण्याचे पदार्थ पोहचवते . यातुन खूप काही शिकण्यासारखे आहे. जसे मी वर उल्लेख केला तसे ह्या सर्वांनी फक्त तयार करून त्या पैसे कमवत आहे.

4 ) नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा विचार करण्याआधी तो व्यवसाय पार्ट टाइम यामध्ये सुरु करा . हळू हळू त्यात जॅम बसवा आणि मग व्यवसाय मोठा झाला तरच नोकरी सोडण्याचा निर्णय घ्या . नोकरी गेली असेल आणि व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहे तर आधी तुमच्या शिल्लक रकमेचा आढावा घ्या . आपल्याला पाच सहा महिने लागणारे पैसे बाजूला ठेवा व उरलेल्या पैश्यातून व्यवसाय सुरु करा . व्यवसायासाठी कर्ज घेत असाल तर त्याची परतफेड वेळेवर करा . आपले सिबिल खराब होणार काही याची काळजी घ्या .

5) उद्योग ,व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या सबसिडी स्किम आहे त्या समजून घ्या ,त्याची पात्रता समजून घ्या . व्यवसायाच्या सुरवातीला ह्या सबसिडी स्कीम एक चांगली मदत ठरू शकतात .

6 ) माणसे हाताळणे : जगात कितीही टेक्नॉलॉजी आली तरी आपण माणसांना कसे हॅण्डल करतो यावर तुमचे यश अवलंबून आहे . माणसांना हॅण्डल करणे याला मी व्यवसायातील पहिल्या स्थानावरील असणारे कौशल्य मानतो . इमोशनल इंटेलिजन्स हे डेनिअल गोलमन याचे गाजलेले पुस्तक आहे . भावनिक बुद्धिमत्ता हि एक गोष्ट ज्याचे कडे आहे त्याने उद्योगाचे यशोशिखर गाठलेच असे समजा . यावर खूप सारा अभ्यास उद्योजकाने करणे गरजेचे आहे .

खरेतर उद्योजकता हा फार मोठा विषय आहे एका छोट्या लेखामध्ये तो समजावून सांगाणे शक्य होणार नाही तरी काही महत्वाचा बाबी उद्योग सुरु करण्याआधी समजून घेणे गरजच आहे.

–राम डावरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -