घरफिचर्ससारांशसीरियस मेन स्मार्ट दलित नायक

सीरियस मेन स्मार्ट दलित नायक

Subscribe

गेल्या काही काळात दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्याला अनेक असे सिनेमे पाहायला मिळाले आहेत,ज्यांनी समाजातील अस्पृश्य समजल्या जाणार्‍या व्यक्तींना नायकत्व बहाल केलंय. हे नायकत्व देताना कुठलीही उपकाराची जाणीव न करून देता त्यांनी त्या नायकाला मजबूत आणि सशक्त दाखविल्यामुळे तो नायक प्रेक्षकांना आपलासा वाटला. काला सिनेमातील रजनीकांतने साकारलेलं ते पात्र याचं उदाहरण, त्या आधी देखील कबाली सिनेमाच्या माध्यमातून त्याने असं पात्रं निभावलं होतं. पा रणजितचे सिनेमे आणि धनुष अभिनित असुरण हा सिनेमा ,यांसारख्या अनेक दाक्षिणात्य सिनेमात सद्य स्थितीत सशक्त दलित नायक दिसतो, ज्याला प्रेक्षकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळाला. मराठीचा विचार केला तर इकडे ही फॅन्ड्री सारखा एखादा सिनेमा पाहायला मिळतो, पण मुख्य धारेतील हिंदी सिनेमात असे प्रयोग क्वचितच आढळतात. सिरियस मेन सिनेमा हा त्याच एका नायकाचं प्रतिनिधित्व करतो.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘सीरियस मेन’ हा अनेक कारणांसाठी विशेष आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी स्टाईल मनोरंजक, सुधीर मिश्रा टाईप पॉलिटिकल कमेंट करणारा, तारे जमीन पर टाईप मुलांची सायकॉलॉजी सांगणारा किंवा दलित नायक दाखविणारा सिनेमा, पण सिनेमाच्या फक्त याच खास बाबी नाहीत. प्रत्येक सिनेमात काही चांगल्या गोष्टी असतात, काही आपल्याला दिसतात, काहींकडे आपण दुर्लक्ष करतो, तर काही आपल्याला कळत नाहीत. आता प्रत्येकालाच त्या समजल्या पाहिजेत, असा आग्रह नसतो आणि तो नसावादेखील या मताचा मी आहे. मनोरंजन या एका उद्देशासाठी सिनेमा पाहणारा मोठा वर्ग आहे आणि त्याचा मुख्य उद्देश केवळ मनोरंजन हाच आहे, पण तरीही एकच सिनेमा काही वेगळं मांडू पाहत असेल तर त्या गोष्टी आधोरेखित करणं हे एका नियमित प्रेक्षकाचं काम आहे. वरकरणी पाहता, सिरीयस मेन हा नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनित आणि सुधीर मिश्रा दिग्दर्शित 2 तास मनोरंजन करणारा, त्यातील काही काळ थोडा सिरीयस करणारा, थोडा वेळ बोअर करणारा आणि शेवटी प्रश्न सोडणारा सिनेमा आहे. पण केवळ अशा 4 ओळींच्या समीक्षेत बसणारा हा सिनेमा असता तर याची एवढी चर्चा झाली नसती, या सिनेमाने मुख्य धारेतील हिंदी सिनेमांना बर्‍याच दिवसांनी एक दलित नायक दिलाय, असा दलित नायक जो बर्‍याच दिवसांपासून सिनेमातून गायब होता. असा दलित नायक जो मजबूत आहे, निर्णय घेतो आणि बदला घेण्याची ताकद ठेवतो, जो बेवारस नाही, जो कुणावर अवलंबून नाही, तो चतुर आहे, तो लोकांना फसवतो आणि वेळ आली की धमकावतोसुद्धा, बॉलीवुड इंडस्ट्रीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत गायब असलेल्या अनेकांचा नायक हा सिरीयस मॅनमध्ये पाहायला मिळतो.

सद्य:स्थितीत भोवताली घडणार्‍या अनेक घटनांमुळे आपल्यात असणारी जातीय अस्मिता आणि तेढ कमी होण्याऐवजी वाढतच आहे. कधी आरक्षण हटवण्याची मागणी होते तर कधी अत्याचाराला दंगलीसाठी जबाबदार ठरवले जाते, भारतात पूर्वी अस्पृश्यता होती हे सर्वांना मान्य आहेच, पण आजही ती देशातील अनेक भागात टिकून आहे ही गोष्ट मान्य करायला अनेकजण तयार नाहीत. आपल्याकडे सिनेमा आला आणि ही अस्पृश्यता काही प्रमाणात मिटण्यास मदत झाली, सिनेमा पाहण्यासाठी सर्वच लोक एकत्र येऊ लागले, ज्यात दलितांचादेखील समावेश होता. इंडस्ट्रीत आणि सिनेमांच्या कथेत त्यांना स्थान होते, कुठल्याही आरक्षणाशिवाय ते असल्याने तिथे फार विरोध झाला नाही. पण आतापर्यंत हिंदी सिनेमातील दलित नायक कसा होता ? आता सिनेमातही असे प्रश्न कशाला ? दलित-सवर्ण हे वाद कशाला? हेही प्रश्न अनेकांना असतील. पण जर मग सिनेमा समाजाचा आरसा आहे तर त्यात दलितांची प्रतिमा कशी दिसायची ? आजपर्यंतच्या प्रवासात मोजकेच मुख्य धारेतील हिंदी सिनेमे होते, ज्यात दलित नायक असायचा.

- Advertisement -

अनेक सिनेमात तर तो केवळ शोषित दाखवला जायचा, जिथे त्याच्यावर होणारे पिढीजात अन्याय दाखवले जायचे किंवा त्याला त्या विरुद्ध लढण्यासाठी मदत करणारा एखादा सवर्ण हिरो दाखवला जायचा. पण हिंदी सिनेमाच्या इतिहासात तुम्हाला असा एखादा दलित नायक आठवतोय का? जो बदला घेतो, लोकांना फसवून अद्दल घडवतो, ज्याला स्वतः वर झालेल्या अन्यायाची जाण आहे म्हणून तो बदल घडविण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतो? सिरीयस मेनचा अयान मनी हा तो चेहरा आहे. जो एका मोठ्या समाजाचं प्रतिनिधित्व करायला निघाला आहे. सिनेमाची सर्वात जमेची बाजू हे नायकाच्या तोंडी असलेले संवाद आहेत, मनु जोसफच्या पुस्तकावर आधारित सिनेमाची कथा युनिक तर आहेच पण वर्तमान स्थितीवर वेळोवेळी भाष्य करणारी देखील आहेच, नवाजच्या सोबतीला नासर,इंदिरा तिवारी यांच्या सारखे कलाकार आणि अक्षत दास सारखा बाल कलाकार या सर्वांचंच काम पाहताना आनंद होतो.

गेल्या काही काळात दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्याला अनेक असे सिनेमे पाहायला मिळाले आहेत,ज्यांनी समाजातील अस्पृश्य समजल्या जाणार्‍या व्यक्तींना नायकत्व बहाल केलंय. हे नायकत्व देताना कुठलीही उपकाराची जाणीव न करून देता त्यांनी त्या नायकाला मजबूत आणि सशक्त दाखविल्यामुळे तो नायक प्रेक्षकांना आपलासा वाटला. काला सिनेमातील रजनीकांतने साकारलेलं ते पात्र याचं उदाहरण, त्या आधी देखील कबाली सिनेमाच्या माध्यमातून त्याने असं पात्रं निभावलं होतं. पा रणजितचे सिनेमे आणि धनुष अभिनित असुरण हा सिनेमा ,यांसारख्या अनेक दाक्षिणात्य सिनेमात सद्य स्थितीत सशक्त दलित नायक दिसतो, ज्याला प्रेक्षकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळाला. मराठीचा विचार केला तर इकडे ही फॅन्ड्री सारखा एखादा सिनेमा पाहायला मिळतो, पण मुख्य धारेतील हिंदी सिनेमात असे प्रयोग क्वचितच आढळतात. सिरियस मेन सिनेमा हा त्याच एका नायकाचं प्रतिनिधित्व करतो, सिनेमाची कथा आहे एका दाक्षिणात्य मध्यमवर्गीय व्यक्तीची जी मुंबईतील एका चाळीत राहते आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च या प्रचंड महत्वाच्या संस्थेत पी ए ची नोकरी करते. सेकंड जनरेशन मध्ये जन्मलेला अयान मनी हा शूद्र आहे जो एका उच्चवर्णीय ब्राम्हणाचा सहायक दाखविला आहे, अरविंद आचार्य ( नासर) हा आहे,अयानचा मालक आणि देशातील नामवंत शास्त्रज्ञ जो आकाशातील एलियनवर संशोधन करतो आहे. वारंवार अयानवर चिडणार्‍या या बॉसला आणि त्याच्यासारख्या अनेक उच्चवर्णीयांना अयान मनी सिरीयस मेन म्हणतो आता ते का ?हे सिनेमा पाहिल्यावर कळेल. तामिळनाडूच्या एका खालच्या समजल्या जाणार्‍या जातीत जन्मलेल्या अयानकडे उत्कृष्ट बुद्धिमत्ता आहे, जे आपण सहन केलं ते आपल्याला मुलाला सहन करावं लागू नये ,यासाठी चाललेली धडपड संपूर्ण सिनेमात दाखविण्यात आली आहे.

- Advertisement -

अयान मनी हा प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारा आणि इंग्रजी बोलणारा स्मार्ट हिरो दाखवल्याने कथेवर पूर्णवेळ त्याची पकड आहे. पहिल्या सीनमध्ये त्याचा पहिलाच संवाद सिनेमात काय असणार हे दाखवून जातो. आदमी कि लाईफ बेमतलब कि होती है, वो बेमतलब पैदा होता है और बेमतलब हि मरता है, जैसे मेरा दादा, एक बार गलती से ट्रेन के फर्स्ट क्लास डिब्बे में चढ गया, किसीने मजाक में कह दिया कि ये ब्राम्हणों का डिब्बा है, तो दादा को अटॅक आ गया और मर गया आता ज्यावेळी तो हा संवाद बोलतोय त्याचवेळी तो बायको सोबत सेक्स करताना दाखवलाय. पुढे संपूर्ण सिनेमात असेच सामाजिक विषयावर भाष्य करणारे अनेक संवाद आहेत.

त्यातला अजून एक संवाद निव्वळ ब्रिलियंट आहे , मुलाच्या शाळेत ऍडमिशन वेळी जेव्हा तिथला अधिकारी अप्रत्यक्षपणे जात जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला दिलेलं उत्तर निव्वळ भन्नाट आहे, साहब आप नहीं बोल सकते, लेकिन मै बोल सकता हूँ त्याला शांत करण्यासाठी दुसरा अधिकारी जेव्हा पाण्याचा ग्लास देतो, तेव्हाही त्याचा डायलॉग भारी आहे. बस इतना ही पाणी निकाला था, मेरे दादाने गांव के कुंए से, गांववालों ने मारकर रीढ़ की हड्डी तोड़ दी थी सिनेमात अयान अनेकवेळा व्हिलन भासतो. स्वतःचा विचार करणारा, लोकांना धमकावणारा, स्वार्थी पण नंतर जेव्हा सिनेमातील इतर पात्रांकडे पाहतो तेव्हा प्रत्येकात तसाच अवगुण पाहायला मिळतो. त्याच्या बॉसपासून ते शाळेच्या मुख्याध्यापिकेपर्यंत सगळेच पात्रं असं वागताना दिसतात, तेव्हा मात्र अयान योग्य वाटायला लागतो. बर्‍याच दिवसांनी हिंदीत असा दलित नायक आढळून आलाय म्हणून एकदा हा सिनेमा पाहायला हरकत नाही.

—अनिकेत दिगंबर म्हस्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -