घरफिचर्ससारांशगुरूंचे स्मरण...

गुरूंचे स्मरण…

Subscribe

वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात. त्यापैकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरूंच्या स्मृतीत समर्पित केली जाते. याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. सोमवारी ३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे. जाणून घेऊया गुरुपौर्णिमेचा शुभ योग, मुहूर्त आणि महत्त्व.

–मानसी सावर्डेकर

दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या पौर्णिमेला आषाढ पौर्णिमा, व्यास पौर्णिमा आणि वेद व्यास जयंती असेही म्हणतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य गुरूंची पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात आणि गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करतात. कारण गुरूच आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. सनातन धर्मात गुरूंना भगवंतापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते. कारण त्यांच्याशिवाय ब्रह्मज्ञान व मोक्षप्राप्ती होत नाही. चला जाणून घेऊया गुरुपौर्णिमेचे महत्त्व, पूजा पद्धत आणि शुभ योग.

- Advertisement -

गुरुपौर्णिमेचे महत्त्व
गुरू आणि शिष्य परंपरेसाठी गुरुपौर्णिमा विशेष आहे. गुरू आपल्या ज्ञानाने शिष्याला योग्य मार्गावर घेऊन जातात. म्हणूनच गुरूंच्या स्मरणार्थ हा सण दरवर्षी साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंव्यतिरिक्त भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते. या दिवशी गायीची पूजा, सेवा आणि दान केल्याने अक्षय पुण्य आणि आरोग्य प्राप्त होते. दुसरीकडे गुरूची पूजा केल्याने कुंडलीतील गुरू दोष संपतो. या दिवशी अनेक मंदिरे आणि मठांमध्ये गुरुपूजा केली जाते.

महर्षी व्यासांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता, म्हणून गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि महर्षी व्यास जयंती असेही म्हणतात. महर्षी व्यासांनी मानवजातीला प्रथमच चार वेदांचे ज्ञान दिले होते, म्हणून त्यांना मानवजातीचे पहिले गुरूदेखील मानले जाते. धर्मग्रंथानुसार व्यासांना तिन्ही कालखंडांचे जाणकार मानले जाते आणि त्यांनी महाभारत ग्रंथ, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, अठरा पुराणे, श्रीमद् भागवत आणि अगणित सृष्टींचे भांडार मानवजातीला दिले आहे. महर्षी व्यासांचे पूर्ण नाव कृष्णद्वैपायन आहे, पण वेद रचल्यानंतर ते वेदांमध्ये वेदव्यास म्हणून ओळखले जाऊ लागले. गुरुपौर्णिमेची सुरुवात महर्षी व्यासांच्या पाच शिष्यांनी केली होती.

- Advertisement -

आषाढ महिन्याची पौर्णिमा प्रारंभ – २ जुलै, रात्री ८ वाजून २१ मिनिटे
आषाढ महिन्याची पौर्णिमा समाप्ती – ३ जुलै, संध्याकाळी ५ वाजून ८ मिनिटे
उदयातिथी लक्षात घेऊन सोमवार, ३ जुलै रोजी गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी ब्रह्मयोग, इंद्र योग आणि सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोगही तयार होत आहे.

गुरुपौर्णिमा पूजा पद्धत

गुरुपौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचा नियम आहे. सकाळी स्नान करून घरी पूजा केल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून गुरूंच्या मूर्तीवर पुष्पहार अर्पण करावा. यानंतर गुरूंच्या घरी जाऊन त्यांची पूजा करा आणि भेटवस्तू देऊन आशीर्वाद घ्या. ज्यांचे गुरू या जगात नाहीत त्यांनी गुरूंच्या चरणांची पूजा करावी. गुरुपौर्णिमेचा दिवस गुरूंना समर्पित आहे. शिष्य त्यांच्या गुरुदेवांची पूजा करतात. ज्यांना गुरू नाही, ते आपले नवे गुरू करतात.

गुरूचे महत्त्व सांगणारा श्लोक

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु: साक्षात् परम ब्रह्म तस्मै गुरुवे नमः॥

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -